agrowon news in marathi, heavy rain in state, Maharashtra | Agrowon

नद्या- नाले तुडुंब, धरणे ‘आेव्हरफ्लो’

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी (ता. १७) नद्या- नाले तुडुंब भरून वाहत असून, धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. साताऱ्यातील कोयना धरणातून यंदा प्रथमच पाणी सोडण्यात आले असून, पुणे जिल्‍ह्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळी अचल साठ्यातून उपयुक्त पातळीत आली आहे, तर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.  

पुणे : राज्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी (ता. १७) नद्या- नाले तुडुंब भरून वाहत असून, धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. पुणे, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, नाशिकमधील धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. साताऱ्यातील कोयना धरणातून यंदा प्रथमच पाणी सोडण्यात आले असून, पुणे जिल्‍ह्यातील जोरदार पावसामुळे उजनी धरणाची पाणीपातळी अचल साठ्यातून उपयुक्त पातळीत आली आहे, तर गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.  

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात अतिवृष्टी झाली असून, मराठवाड्यातही जोरदार पाऊस पडला.

सांगलीतील चांडोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने ऐतवडे खुर्द येथील सांगली- कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने पिके पाण्यात गेली. सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. महाबळेश्‍वर, पाटण, जावळी, सातारा, कऱ्हाड तालुक्‍यांत पिके पाण्याखाली गेल्याने ती कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यात पश्‍चिमेकडील तालुक्यात दमदार पाऊस सुरू असून, धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यांत पावसाने हजेरी लावल्याने खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पावसाचा जोर असल्याने भंडारदरा, मुळा, निळवंडे धरणांत पाण्याची आवक होत आहे. नाशिक जिल्ह्यात नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदीच्या काठी सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. धुळे व जळगाव जिल्ह्यांत मागील दोन दिवस संततधार पाऊस सुरू आहे. नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी अाहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये सातत्याने पाऊस पडत अाहे. शेते पाण्यामुळे तुडुंब भरलेली अाहेत. पिकांचेही नुकसान झाले अाहे. पुराच्या पाण्यामुळे जमीन खरडून गेली असून, उगवलेले पीकसुद्धा पाण्यात गेले. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे इसापूर आणि विष्णुपुरी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मंगळवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : धसई ९५, देहारी ९२, न्याहडी १३५, शहापूर १०१, वसींड १२०, डोलखांब १७९, गोरेगाव १५१, बदलापूर ९०, कर्जत ९७, नेरळ ९९, कडाव ९०, कशेळे ९५, महाड १०३, बिरवडी १२१, करंजवडी १०७, नाटे १०३, खारवली १२४, तुडली १०२, पोलादपूर १३८, कोंडवी १२१, वाकण १२०, कळकवणे १०७, शिरगाव १५७, धामनंद ११७, मंडणगड ९५, देव्हरे १०१, राजापूर ९२, कुंभवडे ९७, कोंडेया १०४, ओनी ११५, भांबेड ११७, विलवडे १६५, अंबोली ११०, कणकवली ९४, वैभववाडी १११, येडगाव ९२, भुईबावडा ९८, वाडा ९५, कडूस १०५, कांचड १३५, सायवन ९०, जव्हार १७५, साखर २१०, मोखडा १७४, खोडला १८५, विक्रमगड ११२.

मध्य महाराष्ट्र : उभेरठाणा ८८, बाऱ्हे ८१, बोरगाव ८०, मानखेड ८३, सुरगाणा ९५, नाणशी १०४, इगतपुरी १४५, घोटी ९२, धारगाव १७०, पेठ १३६, जागमोडी १०४, कोहोर ९३, त्र्यंबकेश्‍वर ११३, वेळुंजे २१८, हर्सूल १३९, शेंडी १७८, पौड ९८, घोटावडे १०१, माले १७२, मुठे १२३, पिरंगूट १५५, भोलावडे १६५, निगुडघर १०५, काले २२३, कार्ला १५९, खडकाळा १०४, लोणावळा १६२, शिवणे १३४, वेल्हा ११६, पानशेत १५१, राजूर १९५, डिंगोरे ८०, कुडे १४०, सातारा १४०, खेड १२८, वर्ये ११५, जावळीमेढा १३९, बामणोली १८५, केळघर १४१, पाटण ८०, म्हावशी ९९, हेळवाक २३१, महाबळेश्‍वर २७०, तापोळा २२५, लामज २३७, शिरसी ८४, चरण ८२, कळे १०३, पडळ ८३, बाजार १३४, करंजफेन १२३, मलकापूर ८६, आंबा ९५, राधानगरी १६५, सरवडे ९२, कसबा ८५, आवळी ९६, राशिवडे ८१, कसबा १३०, गगनबावडा ११८, साळवण २४८, करवीर १०६, निगवे ९५, सिद्धनेर्ली ८५, केनवडे ११६, मुरगुड ९०, कडेगाव ८०, कराडवाडी ९०, आजरा ८९, गवसे १७०, चंदगड १४४, नारंगवाडी ८१, तुर्केवाडी ८०, हेरे १०९.

मराठवाडा : उस्मानपुरा ४६, कांचनवाडी ४२, चिखलठाण ५५, वरूडकाझी ४०, वाळूज ४०, आष्टी ४२, गंगामासळा ५०, कित्तीडगाव ५०, नांदेड शहर ५१, वजीराबाद ४६, तुप्पा ७०, वसरणी ८३, विष्णुपुरी ६०, लिंबगाव ८०, सिंधी ४५, जांब ४५, झरी ६०, शिंगणापूर ४०, पाथरी ७९, पूर्णा ९८, ताडकळस ४२, कांतेश्‍वर ४८, चुडवा ५६, देऊळगाव ४०, मानवत ६८, काकरजवळा ४८, सिरसम ४२, माळहिवरा ४५, हयातनगर ४५, हट्टा ५९.

विदर्भ : नागरधन १०४, रामटेक ९८, आमडी ९२, पारशिवणी ८१, नावेगाव ८०, कान्हान ८७, निमखेडा ८०, मौदा ८१, खाट ११८, चाचेर ८१, कोडामेंडी ७१, सावरगाव ८३, खापा १२९, पाटनसावंगी ११०, शहापूर ९२, भंडारा ११७, बेला ९४, पहेला ७०, मोहाडी ११५, वार्थी १०८, केरडी ७०, केंद्री १०४, कान्हाळगाव ११८, अड्याळ ७२, कोंढा १००, पवनी ७८, चिंचळ ७२, असगाव ८४, साकेली ९४, सांगडी १४२, विरळी ८५, लाखंदूर ६७, बारव्हा ८५, मासाळ ७६, पोहारा ८०, लाखनी ७०, पालंदूर १३४, दासगाव ९३, गोंदिया ७५, खामरी १२२, काट्टीपूर ७४, आमगाव २८८, तिगाव १९५ ठाणा २११, कुऱ्हाडी १८०, मोहाडी १३१, कवरबांध २०७, सालकेसा १८०, शिखारीटोळा १३४, देवरी १३१, बोधगाव देवी १३४, अर्जुनी ७९, महागाव ८१, केशोरी ११०, मेंडकी ९०, कुरखेडा ११८, पुराडा १३५, वैरागड १०३, मुरूमगाव ९४, शंकरपूर ८०.

तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज
बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाची मुसळधार सुरू आहे. आज (ता. १८) कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २१) बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

 २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
साखर २१० (पालघर), वेळुंजे २१८ (नाशिक), काले २२३ (पुणे), हेळवाक २३१, महाबळेश्‍वर २७०, तापोळा २२५, लामज २३७ (सर्व सातारा), साळवण २४८ (कोल्हापूर), आमगाव २८८, ठाणा २११, कवरबांध २०७ (गोंदिया) 

 


इतर अॅग्रो विशेष
शाश्‍वत पर्यायी पीक ः बांबूनिसर्ग चक्र बदलत चालले आहे. आतापर्यंत आपण रेल्वे...
‘जीआय’चे अधिकृत ब्रॅंडींगकोविड महामारीनंतर जागतिक बाजारातही खूप उलटफेर...
अमळनेरच्या भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून...अमळनेर, जि.जळगाव ः येथील मासळी बाजारानजीकच्या...
लाच घेताना कृषी विद्यापीठातील लिपिकाला...नगर : कोरोना पुणे सेवानिवृत्तीची कागदपत्रे...
राज्यात पीक नुकसान ५० लाख हेक्टरच्या...पुणे: राज्यात खरीप पीक नुकसानीची माहिती गोळा...
जुन्या निकषांनुसार कामाला विमा...जळगाव: जुन्या निकषानुसार केळी पिकासाठी काम...
शेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....
किती अन् काय सांगावं...हात टेकलेत आमचेजालना : कुणाला किती अन् काय सांगावं...सततच्या...
पावसामुळे शेतीकामात अडथळे पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे....
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्रीय...
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
पांढऱ्या कापसाचे काळे वास्तवदेशातील सूत गिरण्या आता ९५ टक्के कार्यक्षमतेने...
शेतकऱ्यांच्या कष्टाचे झाले निर्माल्यरिमझिम पाऊस, थेंब पाकळीवर पडला ओघळून जाताना...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
पीक विमा तक्रार निवारणासाठी कोठे जाल?राज्यात यंदा खरीप हंगामात उत्तम पेरा झाला होता....
राज्यात पावसाचा कमीअधिक जोर राहणारपुणे ः राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप...
पणन सुधारणा कायदे शेतकरी हिताचेच!शेतीमालाच्या मार्केटमध्ये दराच्या बाबतीत कधीही...