agrowon news in marathi, if transaction will not done in future market 25 percent fine will recover, Maharashtra | Agrowon

वायदे बाजारात व्यवहार न झाल्यास २५ टक्के दंड करा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 28 मे 2018

लातूर ः शेतीमालाच्या दरासंदर्भात वायदे बाजाराची महत्त्वाची भूमिका आहे. या बाजारात हवेतीलच व्यवहार असतात. त्याचा परिणाम शेतमालाच्या दरावर होत आहे. एखादा व्यवहार झाला नाही तर केवळ तीन टक्के दंडाची तरतूद आहे. हा दंड २५ टक्के करावा व व्यवहार करताना ५० टक्के रक्कम दाखवली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही त्याल सकारात्मक प्रतिसाद दिला असून असे झाले तर वास्तव व्यवहार सुरू होतील, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी रविवारी (ता. २७) येथे पत्रकार परिषदेत दिली.

लातूर ः शेतीमालाच्या दरासंदर्भात वायदे बाजाराची महत्त्वाची भूमिका आहे. या बाजारात हवेतीलच व्यवहार असतात. त्याचा परिणाम शेतमालाच्या दरावर होत आहे. एखादा व्यवहार झाला नाही तर केवळ तीन टक्के दंडाची तरतूद आहे. हा दंड २५ टक्के करावा व व्यवहार करताना ५० टक्के रक्कम दाखवली जावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारनेही त्याल सकारात्मक प्रतिसाद दिला असून असे झाले तर वास्तव व्यवहार सुरू होतील, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी रविवारी (ता. २७) येथे पत्रकार परिषदेत दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येणाऱ्या खरीप हंगामात काय अडचणी येऊ शकतात या संदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. अर्थमंत्री, कृषिमंत्री यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासमोर या अडचणी मांडून उपाय योजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्यात तूर खरेदी केंद्रे बंद झाली आहेत. हरभरा खरेदी केंद्रे बंद होत आहेत. हजारो शेतकऱ्यांची नोंदणी करूनही तूर खरेदी झालेली नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून, केंद्र शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

खाद्यतेलावर आयात शुल्क वाढविण्यासाठी आपण मोठे प्रयत्न केले. क्रूड पाम अॉइलचे ७.५ वरून ४४ टक्के तर रिफाईन तेलाचे १२.५ वरून ५४ टक्के आयात शुल्क केले. त्याचा परिणाम या वर्षी केंद्र शासनाच्या तिजोरीत तीस हजार कोटी रुपये आयात शुल्क मिळाले आहे. या वर्षी सोयाबीनचे वीस टक्क्यांनी पेरा वाढणार आहे. सोयाबीन वर ४५ टक्केच आयात शुल्क लावता येते. पण इतर तेलाच्या बाबतीत ३०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावता येऊ शकते. त्याचा विचार करावा. तसेच सोबायीनचे भाव कोसळू नयेत म्हणून सोयाबीन पेंढसाठी सातवरून दहा टक्के निर्यात अनुदान करून निर्यातीस प्रोत्साहन द्यावे.

असे झाले तर ४० लाख मेट्रिक टन निर्यात होईल. तसेच बांगलादेशमध्ये या पेंढीला मागणी आहे. त्यामुळे रोज एक रेल्वेची रॅक द्यावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे करण्यात आली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतमालाच्या संदर्भात वायदेबाजार महत्त्वाचा आहे. पण बाजार प्रत्यक्ष काहीच दिसत नाही. यात व्यवहार झाला नाही तर केवळ तीन टक्के दंड आकारला जातो. पण भाव मात्र पडले जातात. या करीता हा दंड २५ टक्के करावा व व्यवहार होताना ५० टक्के रक्कम खात्यात दाखविण्याची अट टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच एनसीडीएक्समध्ये सरकारच्या एजन्सीने सहभाग नोंदविला तर शेतमाला अधिक दर मिळतील, ही बाबही केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याची माहिती श्री. पटेल यांनी दिली.

कांद्याचा विषयही ऐरणीवर आहे. गेल्या वर्षीचा ५० लाख टन कांदा शिल्लक आहे. भाव पडलेले आहेत. आता शासनाने प्रक्रिया केलेल्या कांद्यासाठी पाच टक्के निर्यात अनुदान जाहीर केले आहे. पण प्रक्रिया न केलेल्या कांद्यासाठी सात टक्के निर्यात अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती श्री. पटेल यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...