आशियायी राष्ट्रांत उत्पादित न होणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवर कर लावावा

पाशा पटेल
पाशा पटेल

नाशिक : सोयाबीनला किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक भाव मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्वीकारली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये उत्पादित न होणाऱ्या अन्‌ निर्यात होणाऱ्या सोयाबीन खाद्यतेलावर कर लावावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे, अशी माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. श्री. पटेल म्हणाले, की आशियायी राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमधील उत्पादनाला आयातकर लावता येत नाही. नेमकी हीच पळवाट शोधून बांगलादेश, श्रीलंका, नेपाळमध्ये सोयाबीन तेलाची आयात करून निर्यात करण्याचा धंदा काही जणांनी सुरू केला. ही बाब निदर्शनास येताच, मुख्यमंत्र्यांनी आयातकर लावण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधानांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहन सिंह, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना लिहिले आहे. केंद्राने त्यासंबंधीचे धोरण स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा शंभर रुपये अधिकचा भाव क्विंटलमागे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची क्विंटलचा किमान आधारभूत किंमत ३ हजार ३९० रुपये केली आहे. प्रत्यक्षात ३ हजार ९०० रुपये क्विंटलपर्यंत सोयाबीनला भाव मिळाला आहे. पण, नवीन सोयाबीन बाजारात आल्यानंतर त्याच्या भावाची काय स्थिती राहील, अशी चिंता निर्माण झाली होती. अशातच, नव्याने सोयाबीन खरेदीच्या व्यवसायात उतरलेल्या लातूरच्या खासगी कंपनीने सोयाबीनचा क्विंटलचा भाव ३ हजार ५५० रुपये, असा जाहीर केला आहे. म्हणजेच, किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. मुळातच, बोंड अळीच्या समस्येमुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरण्याकडे कल वाढला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com