agrowon news in marathi, Indian onion rate decline after Chinese onion come in market, Maharashtra | Agrowon

चीनच्या घुसखोरीने भारतीय कांद्याला हलका झटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 जुलै 2018

नाशिक : कांदा दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असल्याने सध्या दर स्थिर आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने श्रीलंका, दुबई, सिंगापूर, मलेशिया या देशामध्ये भारतीय कांद्याचे दर वाढताच चीनचा कांदा यायला लागला. त्यामुळे पाच दिवसांपासून पुन्हा भारताचा दर किलो मागे २ रुपयांनी घसरला. 

'नाफेड'ने आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून २ कोटींचा कांदा खरेदी केला आहे. अजून २५ हजार टन कांदा खरेदी होणार असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

नाशिक : कांदा दरवाढीच्या अपेक्षेने शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठवणूक केली असल्याने सध्या दर स्थिर आहे. त्यामुळे आवक कमी झाल्याने श्रीलंका, दुबई, सिंगापूर, मलेशिया या देशामध्ये भारतीय कांद्याचे दर वाढताच चीनचा कांदा यायला लागला. त्यामुळे पाच दिवसांपासून पुन्हा भारताचा दर किलो मागे २ रुपयांनी घसरला. 

'नाफेड'ने आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून २ कोटींचा कांदा खरेदी केला आहे. अजून २५ हजार टन कांदा खरेदी होणार असल्याचे नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितले.

टंचाई, पाऊस या स्थितीत देशभरातील उन्हाळ कांदा अडचणीत आला आहे. या स्थितीत राज्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे कांद्याचे दर वधारले आहेत. नाफेडच्या कांदा खरेदीमुळे चांगले दर मिळण्यास मदत होत आहे.

यंदा पाऊस फक्त ठराविक भागामध्येच कोसळत असल्याने कांदा क्षेत्रात त्याने पाठ फिरविली आहे. त्यामुळे लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात ग्राहकांना वाढत्या कांदा दरामुळे खिशाला झळ पोचू नये, यासाठी केंद्र शासनान नाफेडच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. नाफेडने आतापर्यंत २ कोटी रुपयांचा कांदा बाजारभावाने खरेदी केला आहे.

गतवर्षी दिल्ली शहरात किरकोळ बाजारात कांदा दरात वाढ झाल्याने ग्राहकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा संताप परवडणार नाही म्हणून वाढत्या कांदा दरावर नियंत्रण मिळविण्यासाठी आतापासूनच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे. लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमधून हा कांदा खरेदी करण्यात येत अाहे. उर्वरित कांदा पुणे परिसरातून खरेदी केला जात आहे. या आठवड्यामध्ये लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांदा हा ७०० रुपयांपासून ते १२०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री झाला. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनीदेखील कांदा साठवणूक करून ठेवली आहे. नफा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांनी देखील कांद्याची साठवणूक केलेली आहे. त्यामुळे ग्रामीण परिसरात चाळी कांद्याने भरलेल्या दिसून येत आहे.

कर्नाटकच्या कांद्यावर
नाशिकच्या व्यापाऱ्यांचे भवितव्य

कर्नाटकमध्ये गतवर्षी मुसळधार पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेजी आली होती. यंदा पाऊस ठरविक क्षेत्रामध्येच पाऊस होत असून कांदा लागवडीवर त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे भवितव्य हे कर्नाटकच्या कांद्यावर अवलंबून राहणार असल्याचे कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...