agrowon news in marathi, interview for vasantrao naik marathwada krushi university vice chancellor, Maharashtra | Agrowon

‘वनामकृवि’ कुलगुरू पदासाठी उद्या मुलाखती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १५ व्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी (ता. १९) शोध समितीने मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांकडे शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या गुरुवारी (ता.२४) मुंबई येथील राजभवनात मुलाखती घेण्यात येणार आहेत.

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या १५ व्या कुलगुरुंची निवड प्रक्रिया सुरू आहे. शनिवारी (ता. १९) शोध समितीने मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांकडे शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांच्या गुरुवारी (ता.२४) मुंबई येथील राजभवनात मुलाखती घेण्यात येणार आहेत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू निवडीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्रीमती मंजुळा चेल्लूर या अध्यक्ष असलेल्या त्रिस्तरीय शोध समितीने ९ पात्र उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी (ता. १९)घेतल्या. कुलगुरुपदी निवड करण्यासाठी डाॅ. किरण कोकाटे, डाॅ. अशोक ढवण, डाॅ. उत्तम महाडकर, डाॅ. के. के. सिंग, डाॅ. चक्रवर्ती या पाच उमेदवारांची राज्यपालांकडे शिफारस केली असून, यापैकी एकाची राज्यपालांकडून कुलगुरू पदी नियुक्ती केली जाईल.

त्याअनुषंगाने मुंबई येथील राजभवन येथे गुरुवारी (ता. २४) या पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. शोध समितीने शिफारस केलेल्या अंतिम पाच उमेदवारांपैकी तीन उमेदवार मराठी भाषिक आहेत. हे सर्व राज्यातील कृषी विद्यापीठामधील कामकाजाचे अनुभवी आहेत. त्यामुळे या वेळी मराठी भाषिक उमेदवारास कुलगुरुपदी निवड होण्याची संधी आहे. वनामकृविच्या कुलगुरुंची नियुक्ती करताना मराठी भाषिक उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, अशी मराठवाडा विभागातील शेतकरी, कृषिशास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी यांची मागणी आहे.

इतर अॅग्रो विशेष
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...