मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन प्रकल्पाचे कंत्राट
जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला विदर्भातील एकात्मिक सूक्ष्मसिंचन प्रकल्पाची २३९.१७ कोटी रुपयांची कंत्राट मिळाले. ई-टेंडरिंग प्रक्रियेतून ही ऑर्डर प्राप्त झाली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल. प्रकल्पातून २० हजार ७४८ एकर क्षेत्र ओलीताखाली येणार असून, त्याचा लाभ १० हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करावयाचा आहे.

नागपूर येथिल विदर्भ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे स्रोतापासून थेट मुळापर्यंत (रिसोर्स टू रूट) या संकल्पनेवर आधारित हर खेत को पानी हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्प क्षेत्रांतर्गत ६५ खेड्यांतील १० हजारहून अधिक शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा प्रत्यक्ष लाभ होईल. यामध्ये सुमारे २० हजार ७४८ एकर शेतजमीन ओलिताखाली येईल. हा स्वयंचलित सिंचन प्रकल्प असून, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (पीएमकेएसवाय) मार्गदर्शक तत्त्वावर आधारित आहे.
प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने सगळ्या प्रकारची पाहणी, संपूर्ण प्रणाली, रचना, डिझाईन, संबंधित संस्थांची मंजूरी याचे नियोजन करेल. या प्रकल्पाची ५ वर्षांपर्यंतची देखभालीची जबाबदारी कंपनीची असेल.
- 1 of 436
- ››