agrowon news in marathi, lottery system for beneficiary celection, Maharashtra | Agrowon

लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 जुलै 2018

मला दोन गायींची सोडत लागली आहे. असे पहिल्यांदाच झाले आहे. या पद्धतीत सारे गाव खूष आहे. नेहमीसाठी ही पद्धत खूपच चांगली आहे.
- राजू साळवे, लाभार्थी, चिंचविहिरे

राहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत सोडत पद्धतीने पारदर्शीपणे झाली. गावपातळीवर लाभार्थी निवडीसाठी ही पद्धत राबविणारे चिंचविहिरे  पहिले गाव ठरले आहे. लाभार्थी निवडीसाठीतील अनियमितता टाळण्यासाठी ही पद्धती सर्वत्र वापरण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

ग्रामसभेत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पाच योजनांसाठी लाभार्थी निवड झाली. अनेकदा राजकीय दडपण, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी अशा अनेक त्रुटींचा प्रभाव लाभार्थी निवड पद्धतीत आढळतो. खरे गरजू लाभार्थी वंचित राहतात; तर अनेकदा ठराविक तेच तेच लाभार्थी असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील अनेक त्रुटींवर रामबाण उपाय म्हणून ग्रामसभेत सोडत पद्धतीने लाभार्थी निवड करण्याचा पर्याय कृषी सहायक रायभान गायकवाड यांनी मांडला. सोडत पद्धतीच्या पूर्वतयारीसाठी विशेष ग्रामसभा झाली. त्यात त्यांनी ही सर्व योजना, निकष सांगितले. सर्वांना ही पद्धत पसंत पडली.
सरपंच वृषाली पानसंबळ अध्यक्षस्थानी होत्या.

संकरित गाय वाटपसाठी ८० चिठ्ठ्यांतून पहिले २५ लाभार्थी व नंतरच्या लाभार्थीचा क्रम निश्चिती झाली. त्यांना प्रत्येकी ४० हजार अनुदान मिळेल. शेळी व कुक्कुटपालनाचे ५० चिठ्ठ्यांतून पहिले चाळीस लाभार्थी व नंतर पुढील क्रमनिश्चिती झाली. एकूण दहा लाख अनुदान मिळेल. मत्स्यशेतीचे १५ पैकी दहा लाभार्थी व पुढील क्रम निश्चिती झाली. प्रत्येकी एक लाखप्रमाणे दहा लाख अनुदान मिळेल. मूरघासाच्या प्रकल्पास प्रत्येकी सव्वा लाख अनुदान मिळेल. दहा चिठ्ठ्यातून पाच लाभार्थी निवड झाली. पॅक हाऊसच्या दोन लाख अनुदानासाठी तीन अर्जाच्या चिठ्ठीतून एकाची निवड झाली. एकूण १५८ चिठ्ठीतून ५४ लाभार्थी निवड झाली. त्यांना एकूण २९ लाख अनुदान मिळेल.

मंडळ कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, शांताबाई गिते, दगडू गिते, ग्रामपंचायत सदस्य राजू नालकर, उपसरपंच संतोष पवार, तलाठी वाय. डी. शेख, पर्यवेक्षक बी. एल. ढगे, पोलिस पाटील हिराबाई नरवडे, सुधीर झांबरे आदी या वेळी हजर होते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.

 


इतर अॅग्रो विशेष
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...
बियाणे परवान्यासाठी केंद्रीय पद्धती...नवी दिल्ली: केंद्र सरकार सुधारित बियाणे विधेयक...
शिवनेरीवर उद्या शिवजयंती सोहळापुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या...
चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटकानवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान...
कापूस, मक्यावरील अळी नियंत्रणाचे काम...अकोला ः नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस,...
किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाजपुणे : राज्यात कमाल व किमान तापमानात सातत्याने...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
‘कीडनाशके कायदा’ हवा स्पष्ट शेतकऱ्यांना बनावट कीडनाशके विक्रेत्यांपासून...
राष्ट्रीय मुद्द्यांचा भाजपपुढे गुंतादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या...
‘कोरोना’च्या अफवेमुळे पोल्‍ट्री...पुणे ः चीनमधील कोरोना विषाणूने जगभरात भीतीचे...
मांसाहारामुळे ‘कोरोना’ अशी अफवा...नागपूर: मांसाहार कोरोना व्हायरसला कारणीभूत...
शेतकऱ्यांचे ‘नाइट लाइफ’ कधी संपेल रे भौ...पुसद, जि. यवतमाळ : ग्रामीण भागात शेतीचे प्रश्‍न...
उन्हाचा चटका कायम राहणारपुणे : निरभ्र आकाशामुळे उन्हाचा ताप वाढून...
संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा...दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या...
तुरीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठनागपूर ः खरेदीनंतर चुकाऱ्यास होणारा विलंब आणि...
‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २०...सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या...