agrowon news in Marathi, Madhya pradesh government willing to gave subsidy on soybean seed purched, Maharashtra | Agrowon

सोयाबीन बियाणे खरेदीवर अनुदान देण्याचा मध्य प्रदेशचा विचार
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नवी दिल्ली ः राज्यतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार सोयाबीन उत्पादकांना बियाणे खरेदीवर अनुदान देण्याचा विचार करत आहे. २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीसाठी एक क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीवर १००० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मध्य प्रदेश सरकारच्या सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः राज्यतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मध्य प्रदेश सरकार सोयाबीन उत्पादकांना बियाणे खरेदीवर अनुदान देण्याचा विचार करत आहे. २०१८ च्या खरीप हंगामात पेरणीसाठी एक क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाणे खरेदीवर १००० रुपये अनुदान देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती मध्य प्रदेश सरकारच्या सूत्रांनी दिली. 

राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे खरेदीवर अनुदान देऊन राज्य सरकार सोयाबीन पेरणीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न देत आहे. मागील वर्षी हंगामाच्या सुरवातीला राज्यात कमी पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी भरधान्य उत्पादनाकडे वळाले होते. त्यामुळे मागील वर्षी राज्यात सोयाबीनचा पेरा काहीसा कमी झाला होता. शेतकऱ्यांना परत सोयाबीन उत्पादनाकडे आकर्षित करण्यासाठी बियाणे अनुदान देण्यात येत आहे. जेएस ९५६०, जेएस ९७५२, जेएस २०२९, जेएस २०३४, जेएस २०६०, जेएस २०६९ आणि आरव्हीएस २००१-४, एनआरसी ८६ या सोयाबीन बियाण्यांच्या वाण खरेदीवर हे अनुदान मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रमाणित बियाणे हे चांगल्या दर्जाचे आणि जास्त उत्पादन व साठवण खर्च लागते. हे बियाणे विविध राज्यांच्या कृषी विभागांकडून उत्पादित केले जाते.

‘‘शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारी विक्री केंद्रांवरून बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. या वेळी आधार कार्ड, बॅंक खात्याची माहिती, शेतीसंबंधी कागदपत्रांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केले जाणार आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 
सोयाबीन हे खरिपातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे.

खरिपातील एकूण तेलबिया उत्पादनात सोयाबीनचा वाटा ४० टक्के आहे. मध्य प्रदेश हे देशातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक राज्य आहे. देशातील ११ दशलक्ष हेक्टरवरील एकूण पेरणीच्या ५० टक्के क्षेत्र हे एकट्या मध्य प्रदेशात आहे. मागील वर्षी राज्यात अनेक भागात कमी पाऊस झाला त्यामुळे प्रमाणित बियाण्याचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन किमान १५ हजार ७०० टन प्रमाणित बियाणे कमी पडणार आहे. राज्याला एक लाख ५० हजार टन एकूण सोयाबीन बियाण्याची आवश्यता असते.

कांद्याला चार रुपये अनुदान देणार
राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी मध्य प्रदेश सरकारने कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय घेताला आहे. मध्य प्रदेश कांद्याला प्रतिकिलो चार रुपये, म्हणजेच प्रतिक्विंटल ४०० रुपये प्रोत्साहन अनुदान देणार असल्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. बाजारात कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्याही खाली आल्याने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रेदश सरकारने याआधी इतरही पिकांना अनुदान दिले आहे. ‘‘मध्य प्रदेश सरकारने भात, गहू, हरभरा, मसूर आणि मोहरी पिकाला १०० ते १२५ रुपये प्रतिक्विंटल प्रोत्साहन अनुदान दिले आहे. त्यामुळे राज्यातील या पिकांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला कर मिळून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. मात्र कांद्याला देण्यात येणारे अनुदान हे सर्वाधिक आहे. कांद्याला प्रतिक्विंटल ४०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. लकरच याविषयीचे पत्रक सरकार काढण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
कोल्हापुरात सरासरी ४९ टक्के पावसाची नोंदकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून २८...नांदेड : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...