सरकार सुरू करणार ‘मिल्कबार' योजना : महादेव जानकर

महादेव जानकर
महादेव जानकर

नगर ः राज्यात साठ टक्के दूध असंघटित आहे. मुक्त धोरणामुळे सरकारचे खासगी दूध संघावर कंट्रोल नाही. त्यामुळेच राज्यात दूध धंद्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच ‘ब्रँड'' करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, खासगी संघावाल्यांना ते मान्य नाही. त्यामुळे दुधाबाबत राज्य सरकार कायदा करणार आहे. याशिवाय दूध विक्रीला चालना मिळण्यासाठी राज्यभर ‘मिल्कबार'' उपक्रम सुरू करण्याची संकल्पना आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. शालेय पोषण आहार, आदिवासी विभाग, गरोदर माता, आरोग्य विभागासह सरकारी उपक्रमात दुधाचा वापर करण्यासाठी सरकार प्लॅन करत आहे, असे दूध धंद्यात चुकीचे लोक घुसल्यामुळे लोकांचा दुधावर विश्‍वास राहिला नाही. त्यामुळे आता पुन्हा दुधाबाबत विश्‍वास निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे जानकर यांनी सांगितले. मंत्री जानकर यांनी नगरला आले असता ‘ॲग्रोवन''शी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील अनेक राज्यांत दुधाचे एकच ‘ब्रँड'' आहे. म्हणून त्यांच्याबाबत विश्‍वास आहे. महाराष्ट्रात हे का होत नाही? राज्यात सध्या साठ टक्के दूध खासगी संस्थांच्या, ३९ टक्के दूध सहकारी संस्थांच्या तर केवळ एक टक्‍का दूध राज्य सरकारच्या ताब्यात आहे. राज्य सरकार म्हशीचे दूध ३६ रुपये आणि २७ रुपये गाईचे दूध विकत घेत असून, दर दिवसाला चार कोटी १० लाखांचा तोटा सहन करत आहे. खासगी संघवाले मात्र सोळा, सतरा रुपयांच्या पुढे जात नाहीत. मुक्त धोरणामुळे सरकारला त्यांच्यावर कंट्रोल करता येत नाही. बाहेर राज्यातील दूध संघांनी मागील सरकारने स्वतःचा ब्रँड वाढवण्यासाठी बोलावले. आता ते अडचणीचे ठरत आहे. राज्यात एकच ‘ब्रँड'' करण्याला खासगी दूधवाले तयार नाहीत. त्यांना सरकारची मदत पाहिजे, मात्र शासनाचे धोरण नको आहे. त्यामुळेच आता राज्य सरकार दुधाबाबत कायदा करत असून, पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईल.

राज्यात दुधाची मोठी लॉबी महादेव जानकर म्हणाले, की राज्यात साखर कारखानदारीपेक्षा दुधाची लॉबी मोठी आहे. त्यांना अनेक बाबी मान्य नसतात. राज्यातील दूध उत्पादकांच्या हितासाठी सरकार बरेच बदल करत आहे.‘फिलिपाईन्स'' देशाला दुधाची पावडर देण्याचा विचार चालू आहे. सहकारी दूध संघावर कंट्रोल ठेवण्यासाठी मी पहिल्यांदाच ७९ अ नुसार नोटिसा काढल्या. भेसळ रोखण्यासाठी धाडसत्र सुरू केले आहे. दुग्ध, पशुसंवर्धन, मत्स्य, अन्न व भेसळ विभाग, पोलस विभागाची त्यासाठी मदत घेतली जात आहे. आठ दिवसांत मोठ्या ‘धेंडावर'' धाडी टाकल्या, त्यात ते सापडले. त्यामुळे दूध भेसळ करणारे घाबरले आहेत. पंधरा दिवसांत २०० धाडी टाकल्या आहेत. विशेष म्हणजे धाडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी बोलावले जातात. शेतकऱ्यांनी दूध भेसळीबाबत जागृत राहावे. मागेल त्याला ‘कुक्कुटपालन, शेळीपालन' महादेव जानकर म्हणाले, की राज्यात अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढीपालन महामंडळ आणि मस्त्य उद्योग महामंडळ हे दोनच महामंडळे नफ्यात आहेत. दर दिवसाला दीड कोटी मत्स्यबीज परराज्यातून विकत आणावे लागते. आता राज्यात मस्त्यबीज केंद्रे तालुका पातळीवर सुरू करणार असून, पुढील वर्षी राज्याने दिवसाला पाच कोटी मस्त्यबीज विकावे अशी यंत्रणा आता उभी केली आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन करता यावे, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार असल्याची योजना आणत आहे. यातून जवळपास पाच लाख तरुणांना रोजगार मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com