ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता ओढा

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सातत्याने घसरत आहेत. ही बाब साखर उद्योगाला संकटात आणणारी ठरत आहे. त्यामुळे दराअभावी यंदाच्या हंगामात अनेक देशांनी पक्की साखर तयार करण्यापेक्षा इंधन निर्मितीकडे ओढा सुरू ठेवला आहे. - मानसिंग खोराटे, साखर निर्यातदार
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता ओढा
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता ओढा

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच साखरेला मागणी नसल्याने आता साखर उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या ब्राझील, थायलंड आदी देशांनी यंदाच्या हंगामात लवचिकपणे धोरणात बदल केला आहे. साखरेचे उत्पादन कमी करून कच्ची साखर व इथेनॉलच्या निर्मितीकडे कल वाढविला आहे. सध्या ब्राझीलमध्ये उस हंगाम सुरू असून, या देशाने इथेनॉलच्या निर्मितीलाच प्राधान्य दिले आहे.  सध्या ब्राझील मध्ये ऊस हंगाम सुरू आहे. मार्च ते डिसेंबर या कालावधीत बॉझीलचा हंगाम सुरू असतो. गेल्या दोन तीन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर नीचांकी पातळीवर गेले आहेत. जगभरातच साखरेचे उत्पादन वाढल्याने कोणत्याच भागातून साखरेला मागणी नसल्याचे चित्र दिसतात. ब्राझीलने यंदा इथेनॉलकडे ओढा वाढविला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर २००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या दरात साखर विकणे कोणालाच शक्‍य नसल्याने ब्राझीलने यंदाही जादा प्रमाणात इथेनॉल तयार करण्याला प्राधान्य दिले आहे.  थायलंड करणार जादा इथेनॉलनिर्मिती  ब्राझीलनंतर साखर निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या थायलंडनेही ३ लाख मेट्रीक टन कच्चया साखरेची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या साखरेपासून इथेनॉल बनविण्यासाठी या देशाने आपली धोरणे बदलली आहेत. वातावरण चांगला असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी दोन लाख टन कच्चा साखर इंधन तयार करण्यासाठी वापरली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात पक्क्‍या साखरेची केविलवाणी अवस्था झाल्याने या देशाने तातडीने धोरणात बदल करत इंधन तयार करण्यासाठी पुन्हा ३ लाख टन कच्ची साखर वापरण्याचे निश्‍चित केले आहे. कच्या साखरेचे दरही खाली आले आहेत. पण इंधनाचे दर चांगले असल्याने कच्च्या साखरेपासून इथेनॉल तयार करण्यासाठी थायलंडने पावले उचलली आहेत.  पुढचा हंगाम न घेण्याचा उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा इशारा आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची अवस्था बिकट झाल्याने देशातील साखर कारखानदारही हबकले आहेत. उत्तर प्रदेश शुगल मिल असोसिएशनचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना पत्र लिहून पुढील वर्षीचा हंगाम घेत नसल्याचे कळविले आहे. उत्तर प्रदेशात ९४ खासगी कारखान्यांनी सध्याच्या स्थितीबाबत हतबलता व्यक्त केली आहे. सध्या उत्पादकांच्या देणी देण्याचा असणारा दबाव कारखाने झेलू शकत नाहीत. यामुळे या ओझ्याच्या सावटाखाली पुढील हंगाम सुरू करणे अशक्‍य असल्यांचे उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी पत्रात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून पुरेसे अनुदान मिळाल्याशिवाय राज्यातील पुढील हंगाम सुरू होणे अगदीच अशक्‍य असल्याचे कारखान्याच्या प्रतिनिधींनी पत्रात म्हटले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com