मॉन्सूनची वाटचाल मंदावली...!

मॉन्सूनची वाटचाल मंदावली...
मॉन्सूनची वाटचाल मंदावली...

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (माॅन्सून) मंगळवारी (ता.१२) ईशान्य भारतातील काही भागासह ओडिशा, पश्‍चिम बंगालच्या आणखी काही भागात मॉन्सूनने प्रगती केली.  मात्र माॅन्सूनचा प्रवाह मंदावला असल्याने पुढील आठ दिवसांत माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.  सोमवारी (ता. ११) विदर्भ, मराठवाड्यात प्रगती करत बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत माॅन्सून दाखल झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्रात शनिवारनंतर (ता. ९) माॅन्सूनची वाटचाल जैसे थे अशीच आहे. राज्यात मॉन्सूनने ठाणे, नगर, बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे, तर मंगळवारी (ता. १२) बंगालच्या उपसागराचा संपूर्ण भाग व्यापून संपूर्ण अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीमचा काही भाग आणि अोडिशा, पश्‍चिम बंगालचा आणखी काही भागात मजल मारली आहे.  पश्‍चिम बंगाल, बांग्लादेशदरम्यान कमी दाबाचे क्षेत्रामुळे ईशान्य भारतासह पूर्वकडील राज्यांमध्ये मॉन्सूनने प्रगती केली असली, तरी मॉन्सूनच्या बंगालच्या उपसागरावरील शाखा यंदा संथ गतीने प्रवास करत आहे. यातच मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने पुढील आठ दिवस कोणतही वाटचाल होणार नसल्याने मध्य भारतासह, उत्तर भारतातील मॉन्सूनचे आगमन लांबणीवर पडणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com