agrowon news in marathi, monsoon reached at Amravati, Gondiya, Maharashtra | Agrowon

माॅन्सूनची वाटचाल आठवडाभर लांबणीवर...
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) वाटचाल मजल-दरमजल करीत सुरू आहे. सोमवारी (ता. ११) मॉन्सूनने विदर्भ, मराठवाड्यात प्रगती करत बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत धाव घेतली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र माॅन्सूनने आणखी प्रगती केलेली नाही, तर ईशान्य भारतात बुधवारपर्यंत आणखी प्रगती शक्य आहे. त्यानंतर मात्र माॅन्सूनचा प्रवाह कमकुवत होणार असल्याने आठवडाभर माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) वाटचाल मजल-दरमजल करीत सुरू आहे. सोमवारी (ता. ११) मॉन्सूनने विदर्भ, मराठवाड्यात प्रगती करत बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत धाव घेतली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र माॅन्सूनने आणखी प्रगती केलेली नाही, तर ईशान्य भारतात बुधवारपर्यंत आणखी प्रगती शक्य आहे. त्यानंतर मात्र माॅन्सूनचा प्रवाह कमकुवत होणार असल्याने आठवडाभर माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले आहे.

माॅन्सूनने शनिवारी (ता. ९) निम्मा महाराष्ट्र व्यापल्यानंतर रविवारी (ता.११) कोणतीही प्रगती केली नव्हती. त्यानंतर आज (सोमवारी) मॉन्सूनने विदर्भाच्या काही भागात प्रगती केली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील माॅन्सूनची सीमा मात्र कायम आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनने ईशान्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये हजेरी लावली. पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालयाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) पूर्व भारतातील आणखी काही राज्यांमध्ये माॅन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

ईशान्य भागातील मॉन्सूनची वाटचाल यंदा संथ गतीने सुरू आहे. साधारणपणे ५ जूनपर्यंत माॅन्सून ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये दाखल होत असतो. यंदा ११ जून उलटूनही मॉन्सूनने अपेक्षित पल्ला गाठला असून असाम, अरुणाचल प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून पोचलेला नाही, तर माॅन्सून १० जूनपर्यंत देशाच्या पूर्व भागातील बिहार राज्यापर्यंत पोचतो, मात्र या भागातील मॉन्सूनचे आगमनही लांबले असून, पश्‍चिम बंगालच्या दक्षिण भागापर्यंतच मॉन्सूनची वाटचाल झालेली आहे.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...