मॉन्सूनची आसाम, मेघालय, सिक्कीमपर्यंत मजल

पटना येथे मंगळवारी (ता. १२) दुपारी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
पटना येथे मंगळवारी (ता. १२) दुपारी जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

नवी दिल्ली ः मॉन्सूनने अरुणाचल प्रदेश व्यापल्यानंतर आसाम, मेघालय, सिक्कीमपर्यंत मजल मारली आहे. आसाम, मेघालय, सिक्कीममध्ये अनेक भागात पाऊस सुरू आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. देशात मॉन्सून दाखल झाल्यानंतर पहिल्या ११ दिवसांत सरासरीच्या १८ टक्के जास्त पाऊस झाला. या काळात ४८.२ मीलिमीटर पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने यंदा सरासरी पावसाच्या ९७ टक्के म्हणजेच सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रेदश आणि मध्य प्रदेशातील बऱ्याच भागात पाऊस झाला. कर्नाटकच्या किनारी भागात सलग चौथ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली.   

केरळमध्ये १६ जण मृत्युमुखी गेल्या २९ मेपासून केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६ जण मरण पावले असून, सहा कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूलमंत्री इ. चंद्रशेखरन यांनी विधानसभेत सांगितले. प्राथमिक अंदाजानुसार एक हजार १०९ घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर, ६१ घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, ३३ कुटुंबांतील १२२ नागरिकांना मदत शिबिरात हलविण्यात आले आहे. या पावसामुळे १८८.४१ हेक्‍टरमधील शेतीचे सहा कोटी ३४ लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय, विरोधी पक्षाचे नेते रमेश चेन्नीथाला म्हणाले, की या पावसाचा दोन हजार ७८४ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना राज्य आपत्ती निवारण निधीतून चार लाख रुपये देण्यात येणार आहेत.    

कर्नाटकात एप्रिलपासून १०४ जणांचा मृत्यू कर्नाटक राज्यात एप्रिल महिन्यापासून सतत होणाऱ्या अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी आदी घटनांमध्ये १०४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे वाणिज्यमंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी दिली. मंत्री देशपांडे म्हणाले, की राज्यात पावसाची निगडीत वेगवेगळ्या घटनांमध्ये एप्रिलपासून १०४ जणांचा मृत्यू झाला. यापेैकी ९४ जणांचा मृत्यू अंगावर वीज पडून झाला आहे, तर १० जणांचा मृत्यू पुरात वाहून जाणे, झाडे आणि भिंत कोसळणे आदी घटनांमध्ये झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना नैसर्गिक संकट निवारण निधीतून प्रत्येकी चार लाख तर मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपये मदत दिली जाणार आहे. जिवितहानीच्या मदतीसाठी ४.१६ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. तर जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी १.६० कोटी आणि घरांच्या नुकसानीसाठी २.८७ कोटी रुपयांची तरतुद केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com