agrowon news in marathi, notice for reliance company, Maharashtra | Agrowon

रिलायन्स विमा कंपनीला पीकविमाप्रकरणी नोटीस
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 जुलै 2018

परभणी ः २०१७ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत केलेल्या अनियमिततेप्रकरणी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीला शनिवारी (ता. १४) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत सर्व बाबींचा खुलासा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

परभणी ः २०१७ च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेच्या अंमलबजावणीत केलेल्या अनियमिततेप्रकरणी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीला शनिवारी (ता. १४) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आठ दिवसांच्या आत सर्व बाबींचा खुलासा करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेची अमंलबजावणी करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने राज्य शासन आणि रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक होते.

परंतु रिलायन्स विमा कंपनीने अटी, शर्तींचे पालन न करता पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विहित वेळेत नुकसान भरपाई अदा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी १ हजार ३०० च्यावर तक्रारी विमा कंपनीकडे पाठविल्या; परंतु त्यांचे निरसन करण्यात आलेले नाही. विमा कंपनीने तालुका स्तरावर कार्यालय उघडून तेथे विमा प्रतिनिधींची नेमणूक करणे आवश्यक आहे. परंतु कंपनीकडून याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाले नाही.

विमा परतावा प्रश्नांवर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणासह विविध आंदोलने सुरू केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. याप्रकरणी सर्व बाबीचा खुलासा आठ दिवसांत सादर करण्यात यावा, अन्यथा कादेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीचे प्रकाश थाॅमस यांना पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिसीद्वारे दिला आहे.

अदा केलेली आणि खात्यात जमा रकमेत फरक
पोखर्णी (ता. परभणी) येथील नरहरी सोपान वाघ यांच्या १ हेक्टरवरील मूग पिकाच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीने ४ हजार ७४६.८७ रुपये, ६० गुंठे उडीद पिकाच्या नुकसानीबद्दल ५८९.९९ रुपये अदा केल्याचे दाखविले आहे. परंतु नरहरी वाघ यांच्या खात्यावर प्रत्यक्षात २ हजार ३५६ रुपये जमा झाले असल्याचे आढळून आले. प्रसाद तातेराव वाघ यांना कंपनीने मूग आणि उडिदाच्या नुकसानीबद्दल अदा केल्याचे दाखविलेली रक्कम आणि त्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेली रक्कम यामध्ये १ हजार ७७१.२४ रुपये एवढी तफावत येत आहे. या दोन शेतकऱ्यांना अदा केलेल्या विमा परतावा रकमेची शेतकऱ्यांच्या खात्यावर कमी रक्कम जमा झाल्याचे आढळून आले आहे.

इतर बातम्या
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून...नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...