agrowon news in marathi, opposition anarchy due to boll worm, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

बोंडअळी मदतीवरून विरोधकांचा गोंधळ

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 जुलै 2018

नागपूर ः बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी सभागृहात हेक्‍टरी ३४ हजार ७०० रुपयांची घोषणा करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन हजार रुपये पडले. त्यामुळे सभागृहातच अशा प्रकारे खोट बोलले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सोमवारी (ता. ९) विधान परिषदेत गोंधळ घातला. गोंधळामुळे तीनदा सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरूच असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

नागपूर ः बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपोटी सभागृहात हेक्‍टरी ३४ हजार ७०० रुपयांची घोषणा करण्यात आली. परंतु शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोन हजार रुपये पडले. त्यामुळे सभागृहातच अशा प्रकारे खोट बोलले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सोमवारी (ता. ९) विधान परिषदेत गोंधळ घातला. गोंधळामुळे तीनदा सभागृहाचे काम तहकूब करण्यात आले. त्यानंतरही गोंधळ सुरूच असल्याने दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.

विधान परिषदेचे पहिल्या आठवड्याचे कामकाज कोणत्याही चर्चेविनाच पार पडले. दुसऱ्या आठवड्यात कामकाजाला गती येईल, शेती, सिंचन या प्रश्‍नांवर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. परंतु दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बोंडअळीची जाहीर केलेली हेक्‍टरी ३४ हजार ७०० रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नियम ३८९ अन्वये यावर चर्चा घडवून आणावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. परंतु सभापतींनी प्रस्ताव नाकारत प्रश्‍नोत्तरे सुरू करण्यास सांगितले. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळे दोनदा कामकाज अर्धा-अर्धा तास तहकूब करण्यात आले. त्यानंतरही विरोधक जुमानत नसल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 


इतर अॅग्रो विशेष
अतिदुर्गम भागात दुग्धव्यवसायातून...आदिवासी व अतिदुर्गम असलेल्या शेलद- मुंढेवाडी (ता...
प्रक्रिया उद्योगाअभावी संत्रा...नागपूर : राज्यात सध्या संत्र्याखालील सर्वाधिक...
वीस हजार अन्न प्रक्रिया उद्योग होणार...पुणे : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न उद्योग उन्नयन...
महाबळेश्वरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर...मुंबई : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर आता...
पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश...पुणे ः कृषी व मत्स्य विद्याशाखेच्या पदवी...
दुर्गम भागातील गावकऱ्यांनी स्वतःच केला...जामली, जि. अमरावती ः चिखलदरा तालुक्‍यातील...
बारदान्याच्या ६५ कोटींची शेतकऱ्यांना...भंडारा: गेल्या खरीप व रब्बी हंगामात स्वतःचा...
ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक...सांगली ः : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ...
ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरला पसंती पुणे : मजूर टंचाईमुळे राज्यातील साखर...
‘ऑपरेशन ग्रीन’ डिसेंबरपर्यंत चालणार पुणे : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत भाजीपालावर्गीय...
शासकीय केंद्रातं खरेदीत कापूस कटतीतून...जळगाव ः शासकीय कापूस खरेदीने शेतकऱ्यांना आधार...
गगनबावड्यात यंदा सर्वाधिक पाऊस पुणे ः देशात यंदा परतीचा मॉन्सून अधिक काळ...
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...