agrowon news in marathi, pasha patel says, discussion on milk issue in delhi, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची चाचपणी : पाशा पटेल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा काढण्यासाठी देशातील सुमारे साडेतीन लाख टनांचा दुग्धजन्य उत्पादनांचा साठा कमी करण्यासाठी बफर स्टॉकसह, शालेय पाेषण आहारात दुधाचा वापर, दुग्धजन्य उत्पादनांवरील जीएसटी कमी करणे, मित्र राष्ट्रांना आर्थिक मदती एेवजी दुग्धजन्य उत्पादनांची मदत करता येईल का? आदि विविध विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता.१७) दिल्लीत बाेलविलेल्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत आज बुधवारी (ता.१८) पुन्हा बैठक हाेणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. 

नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा काढण्यासाठी देशातील सुमारे साडेतीन लाख टनांचा दुग्धजन्य उत्पादनांचा साठा कमी करण्यासाठी बफर स्टॉकसह, शालेय पाेषण आहारात दुधाचा वापर, दुग्धजन्य उत्पादनांवरील जीएसटी कमी करणे, मित्र राष्ट्रांना आर्थिक मदती एेवजी दुग्धजन्य उत्पादनांची मदत करता येईल का? आदि विविध विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता.१७) दिल्लीत बाेलविलेल्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत आज बुधवारी (ता.१८) पुन्हा बैठक हाेणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. 

दूध दर प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सुरेश प्रभू, पीयूष गाेयल, केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहन सिंह राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यात बैठक झाली. बैठकीला साेनई दूधचे दशरथ माने, अमूल दूधचे व्यवस्थापकीय संचालक श्री. साेडी आदी उपस्थित हाेते. 

बैठकीमध्ये देशांतर्गत असलेला दूध पावडर, बटर, तूप आदि २० प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा कमी करण्याबराेबरच, या उत्पादनांचा बफर स्टॉक करता येईल का? लॅक्टाेज पावडरचा गैर वैद्यकीय वापरातून कृत्रिम दूध बनवले जाते का? आणि याचा अतिरिक्त दुधाशी संबंध आहे का? यावर चर्चा झाली, तर हा स्टॉक कमी करण्यासाठी मित्र राष्ट्रांना करावयाच्या आर्थिक मदतीएेवजी दुग्धजन्य पदार्थांची मदत करता येईल का? याबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी, देशपातळीवर शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश करता येईल का? यासाठी प्रकाश जावडेकर आणि मेनका गांधी यांच्या बराेबर बुधवारी (ता.१८) बैठक हाेणार आहे.   

याबाबत बाेलताना दशरथ माने म्हणाले, की दूध दर प्रश्‍न साेडविण्याबाबत सर्वंकष चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी आमचे म्हणणे आणि मागण्या एेकून घेतल्या. चर्चा सकारात्मक झाली. मात्र केंद्र सरकारने २० जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीएसटी ५ टक्के केला नाही तर आम्ही जाहीर केलेली १ रुपयांची दरवाढ देऊ शकणार नाही. याचा विचार केंद्र सरकारने करावा.

इतर अॅग्रो विशेष
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
गुरुवारपासून पुन्हा वादळी पावसाचा इशारापुणे : राज्यात वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली...
राज्यातील कांदा उत्पादकांना ५५० कोटींचा...नाशिक ः दसरा-दिवाळीच्या तोंडावर कांद्याला चांगला...
‘ती’चा गावगाड्याला मिळतोय आधारसोलापूर : चूल अन्‌ मूल या मर्यादेला बगल देत महिला...
राजद्रोह कायद्याची गरज काय?का ही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. एका...
को-मार्केटिंगचा घोळबियाणे, खते, कीडनाशके या कृषी उत्पादनासाठीच्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला...नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या...
झोपडीचा आधार बांबू पोचला सातासमुद्रापारवेलतूर, जि. नागपूरः गरिबांच्या झोपडीचा आधार...
देशाच्या उत्तर-मध्य बहुतांश भागातून...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल-दरमजल...
रब्बीसाठी अनुदानित हरभरा बियाणे उपलब्धपुणे: राज्यात गेल्या रब्बी हंगामात अनुदानित हरभरा...
बुधवारपासून पावसाची शक्यतापुणे: देशातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू...
पावासामुळे खरीप पिके, भाजीपाल्यासह...पुणे : राज्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वादळी...
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...