मागणीनंतरच तणनाशक, कीटकनाशकाला परवानगी

मागणीनंतरच तणनाशक, कीटकनाशकाला परवानगी
मागणीनंतरच तणनाशक, कीटकनाशकाला परवानगी

यवतमाळ: कीडकनाशक, कीटकनाशक मिश्रणामुळे मागील वर्षी अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यानंतर तणनाशक व सहा मॉलिक्‍यूलला जिल्ह्यात बंदीचे तोंडी आदेश होते. आता कृषी सेवा केंद्रांना आधी मागणी करावी लागणार असून, त्यानंतरच परवानगी देऊन तणनाशक, कीटकनाशकाला कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यामध्ये समाविष्ट केले जाणार आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर फवारणी करताना अनेक शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाली होती. त्यात २२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला. ७५० वर शेतकरी व शेतमजूर बाधित झाले. विषबाधेचे कारण शोधले असता, काही ठिकाणी तणनाशक, तर काही ठिकाणी कीटकनाशकांचे मिश्रण जबाबदार असल्याचा निष्कर्ष कृषी विभागाने काढला. त्यामुळे यंदा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात सहा कीटकनाशक व तणनाशकांना विक्री बंदीचे तोंडी आदेश होते. परिणामी, जिल्ह्यात सध्या तणनाशक व सहा कीटकनाशकांना विक्री परवानगी नव्हती. आता, कृषी सेवा केंद्र संचालकांच्या वैयक्तिक मागणीनंतरच कृषी सेवा केंद्र चालकांना परवानगी दिली जाणार आहे. शिवाय, त्यानंतर परवान्यात त्या कीटकनाशक, तणनाशकांची नोंद केली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com