जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध

जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध
जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध

नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगितल्यानंतर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना फोनवरून ‘आताच कसे तुम्ही शेतकऱ्यांचे असल्याचे सांगता, एवढ्या दिवस कोठे होता,’ अशी विचारणा करणाऱ्या नगरमधील एका शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दुधाला सत्तावीस रुपये दर मिळावा किंवा प्रति लिटर पाच रुपये शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंदोलन सुरू केले आहे. दुधाचा प्रश्‍न गंभीर असून, दराअभावी हा व्यवसाय मोडकळीस आला असल्याने अनेक शेतकरी, संघटना आणि कार्यकर्त्यांनी अंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अंदोलन सुरू झाल्यानंतर नगर तालुक्‍यातील मांडवे गावच्या एका शेतकऱ्याने काल (सोमवारी) थेट दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना फोन लावला. ‘‘सरकार दुधाच दराबाबत सकारात्मक आहे,’’ असे सांगितले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जानकर यांना त्या शेतकऱ्याने ‘‘आताच दुधावर कसे बोलता, याआधी कोठे होतात,’’ अशी विचारणा केल्यानंतर मंत्री जानकर यांनी ‘प्रत्यक्ष भेटा, बोलू’ असे सांगितले. मात्र त्या शेतकऱ्याने पुन्हा चढ्या आवाजात तोच प्रश्‍न केला. त्यानंतर मंत्र्यांनी फोन बंद केला.  काही वेळाने मात्र पोलिस त्या शेतकऱ्याच्या घरी पोचले. फोन करणारा शेतकरी घरी नसल्याने त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले व चौकशी करून सोडून दिले. फोन करणारा शेतकरी दुसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ‘मंत्र्यांना फोन करणे शेतकऱ्याला महाग पडले’, असा संदेश सर्वत्र गेल्यानंतर मात्र पोलिसही त्याबाबत काही बोलायला तयार नाहीत. मात्र फोन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचा शोध घेत असल्याचा बाबीला पोलिसांनी दुजोरा दिला. मात्र त्याबाबत पोलिस स्पष्ट बोलत नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com