सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करण्याची गरज ः रघुनाथदादा पाटील

सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करण्याची गरज ः रघुनाथदादा पाटील

पुणे ः फळे भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी शेतकरी आता गावातून शहारांमध्ये येऊ लागला आहे. यामुळे शेतमालाला थेट ग्राहक मिळून ५० टक्क्यांपेक्षा अधिकचा फायदा शेतकऱ्याला मिळत आहे. हे आठवडे बाजाराने सिद्ध करून दाखविले आहे. असेच सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करून निर्यातबंदी कायमची हटविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले. शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री याेजनेअंतर्गत कृषी पणन मंडळाच्या वतीने आयाेजित स्वामी समर्थ शेतकरी आठवडे बाजाराचा चाैथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रविवारी (ता. २४) आयाेजित कार्यक्रमात श्री. पाटील बाेलत हाेते. या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते डाॅ. कुमार सप्तर्षी, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, आत्माचे संचालक सुभाष खेमनर, कृषी संचालक प्रल्हाद पाेकळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशाक बी. जे. देशमुख, भारत विकास ग्रुपचे संचालक हणमंत गायकवाड, माजी कृषी संचालक द. श्री. व्यवहारे, स्वामी सर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक नरेंद्र पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित हाेते. श्री. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांना बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्याची मागणी स्व. शरद जाेशी यांनी ४० वर्षांपूर्वीच मांडली आहे. या मागणीची आता अंमलबजावणी हाेऊ लागली असून, सरकार विविध अनुदानातून खते, बियाणे, तंत्रज्ञानाच्या घाेषणा करतात. मात्र शेतकऱ्यांना अनुदान न देता त्याने पिकविलेल्या शेतमालाच्या घामाचे दाम दिले पाहिजे. शेतमालाला भाव नसल्यानेच आत्महत्या वाढत आहेत. फळे भाजीपाला नियमनमुक्तीमुळे शेतकरी आता शहरांमध्ये मध्यस्थांशिवाय शेतमालाची विक्री करू लागला आहे. यामुळे जगाच्या पाठीवर जिथे जिथे शेतमालाला दर आहेत. त्याठिकाणी विक्रीसाठी नेण्यची हिंमत शेतकऱ्यांमध्ये आहे. मात्र जागतीक पातळीवर शेतमालाचे दर वाढले कि, सरकार निर्यात बंदी करते व शेतमालाचे दर काेसळतात. यासाठी शेतकरी विराेधी धाेरणे बदलून सर्वच शेतमाल नियंत्रण मुक्त करण्याची गरज आहे. कृषी आयुक्त सिंग म्हणाले, की आठवडे बाजार यशस्वी पणे संचलन केल्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांमध्ये विश्‍वासाचे नाते निर्माण झाले आहे. आठवडे बाजारामुळे शेतकऱ्यांना आता दिवसभर शेतमाल विक्रीसाठी बसण्याची गरज नाही. सकाळी दाेन तासात शेतमाल विक्री करुन शेतकरी पुन्हा गावाला जाऊ शकताे. दर आठवडे बाजारात फिरल्यावर ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केल्याचे अनुभव मला आला आहे. अशाच प्रकारचे १० हजार आठवडे बाजारांचे जाळे राज्यात उभे करण्याची गरज आहे. यासाठी स्वामी समर्थ आठवडे बाजार आदर्श ठरला आहे.  यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी, आत्माचे संचालक खेमनर, शेतमाल बाजारपेठेचे अभ्यासक दीपक चव्हाण, बी. जे. देशमुख यांनी मनाेगत व्यक्त केले. विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीनेे विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीने आणि भरल्या पााेटाने मांडण्यात येत असल्याची टीका रघुनाथदादा पाटील यांनी केली. १९६० नंतर युरीया आणि इतर खतांचा वापर सुरू झाला. याअगाेदरची शेती हि सेंद्रिय शेतीच हाेती. मात्र वाढती लाेकसंख्येचा विचार करता शेतमालाच्या उत्पादनवाढीची गरजेतून तंत्रज्ञान आहे. खतांच्या वापरांमुळे सर्वांनाच कर्कराेग झाला असता आणि भारताची लाेकसंख्या १२५ काेटी झाली नसती. कृषी अधिकारी आणि काही जणांकडून विषमुक्त शेतमालाची मांडणी चुकीच्या पद्धतीने हाेत असून, शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे स्वांतत्र्य हवे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com