कर्नाटकचा किनारी भाग, मध्य प्रदेशात दमदार पाऊस

हरियानातील अंबाला शहरात पावसाने रस्त्यावर असे पाणी साचले होते.
हरियानातील अंबाला शहरात पावसाने रस्त्यावर असे पाणी साचले होते.

नवी दिल्ली ः माॅन्सूनने कर्नाटक, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही राज्ये व्यापाल्यानंतर येथे पाऊस सुरू आहे. किनारी कर्नाटकचा भाग, दक्षिण आणि उत्तर कर्नाटक, केरळ आणि तेलंगण राज्यांत शनिवारी (ता. ९) अनेक भागांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.  मॉन्सूनने केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेशचा सर्व भाग व्यापाल्यानंतर वरील भागात मार्गक्रमण सुरू केले आहे. शनिवारी केरळ, कर्नाटकचा किनारी भाग, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस झाला. तेलंगणच्या दक्षिण भागातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच येणाऱ्या २४ तासांत किनारी कर्नाटक, दक्षिण कर्नाटक, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे; तर उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, तेलंगणच्या अनेक भागांत, तर तमिळनाडू आणि रायसीमाच्या काही भागात पावासाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटकात मॉन्सून जोरदार बरसला. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. दक्षिहा कन्नडा जिल्ह्यात पुरात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दक्षिहा कन्नडा, उडपी आणि मंगलूरू या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे स्थानिक प्रशासनाने शाळा आणि काॅलेजेसला सुटी जाहीर केली होती. शहरांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. धरणांच्या खोऱ्यांत पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली होती. पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  

मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये पाऊस मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच, छत्तीसगडच्या बहुतांश भागांत मध्यम पाऊस, तर मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी मध्य प्रदेशच्या अनेक भागांत मध्यम ते हलका पाऊस झाला. पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशच्या उमराई, सौसर, बरेली, नरसिंगपूर, छत्तरपूर, पुष्पजगड, जबलपूर, सेवनी, अलताई, अतनेर बेगमगंज, पाचमराही, सलवानी, उद्यपूर, मांडला, गूना, घनसोर आदी ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com