मुंबईसह काेकणात पावसाचा कहर सुरूच

रविवारी रात्री पातूर, बाळापूर तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बाळापूर तालुक्यात देगाव शिवारात नदी-नाल्यांना पूर आले. नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने देगाव येथील संतोष अासोलकर यांची चार एकर शेती खरडून गेली.
रविवारी रात्री पातूर, बाळापूर तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे बाळापूर तालुक्यात देगाव शिवारात नदी-नाल्यांना पूर आले. नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने देगाव येथील संतोष अासोलकर यांची चार एकर शेती खरडून गेली.

पुणे : मुंबईसह कोकणात पडत असलेल्या धुव्वाधार पावसाचा कहर सोमवारी सुरूच होता. सोमवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर पालघर आणि रायगडमध्ये २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडल्याने तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील ८० हून अधिक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले. जवळपास १२ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. डहाणू येथे २४ तासांमध्ये ३५० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले, तर कृषी विभागाकडे डहाणूत २२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

पालघरसह मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे लाेहमार्गावर पाणी साचले, त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला, तर पाणी साचल्याने अनेक प्रमुख रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. कुडाळमधील कार्ली नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने २७ गावांची संपर्क तुटला होता. रायगडमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला, तर सांगलीत जोरदार पावसामुळे कृष्णेचा पाणीपातळीत वाढ झाली. वऱ्हाडातही पावसाने दमदार हजेरीने अकोल्यातील मन नदीला मोठा पूर येऊन शेगाव-नागझरीमार्गे अकोला रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. 

सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्राेत कृषी विभाग)

कोकण : ठाणे १३२, बलकुम १९२, भाइंदर १००, मुंब्रा १३४, दहिसर १७५, बेलापूर १९२, भिवंडी १२५, अप्पर भिवंडी १०३, खारबाव १३२, अलिबाग १०२, सरल ११७, चरी ११२, रामरज १२०, कर्नाळा १११, नेरळ १३०, कळंब १२५, वशी १०५, कसू १२०, महाड १२०, नाटे १०९, तुडील १०३, माणगाव १६२, इंदापूर १५०, गोरेगाव १२८, लोनेरे १०४, नागोठणे १०३, चानेरा ११७, कोलाड १०४, मुरूड २२०, नंदगाव १७५, बवरली १५४, श्रीवर्धन १२४, वालवटी १३०, बोरलीपंचटण १७५, म्हसळा २३०, खामगाव २४१, तळा १९२, मेंढा १५३, सावरडे १४५, दापोली १२०, बुरवंडी १२५, दाभोळ १३१, वाकवली १४८, पालगड ११२, वेलवी १२०, शिरशी १०९, कुलवंडी १०९, दाभील ११०, मंडणगड १२०, म्हाप्रल १०८, देव्हरे १३१, माखजन १८२, राजापुर १००, सवंडल १४२, बांदा ११७, अंबोली १४५, कडवल १२८, कसाल १२५, वसई २३५, मांडवी १९८, अगशी २४७, निर्मल २२७, विरार २७६, माणिकपूर २१२, डहाणू २२८, मल्याण २२०, चिंचणी २९१, पालघर २२०, बोईसर १८४, तारापूर १८०, तलसरी १२२, झरी १७३, तलवड १८०. 

मध्य महाराष्ट्र : तोंडापूर ४६, बोदवड ५८, नांदगाव ६०, केडगाव ६६, श्रीरामपूर ६३, उंदीरगाव ६०, भोलावडे ८५, लोणावळा ६६, बार्शी ५२, पांगरी ४०, खांडवी ४७, बामणोली ४८, हेळवाक ८१, मोरगिरी ५६, महाबळेश्‍वर ८७, तापोळा ९५, लामज १०३, कोकरुड ४७, करंजफेन ८२, मलकापूर ४५, आंबा ९५. सरवडे ४४, कसबा ५७, गगनबावडा ६९, साळवण ७४, मुरगुड ४१, पिंपळगाव ५८, कडेगाव ५५, कराडवाडी ४८, आजरा ५२, गवसे ४३, चंदगड ५१, माणगाव ५४, हेरे ५४. 

मराठवाडा :  लाडसावंगी ४५, चोवका ४०, अजिंठा ५२, राजूर ४३, वागरूळ ५६, बदनापूर ४५, दाभाडी ६४, परांडा ४०, जवळा ४२, लिंबगाव ५५, तळणी ९७, निवघा ९३, पिंपरखेड ४३, मोघाळी ४५, किनवट ४४, हिमायतनगर ५८, सरसम ४७, पूर्णा ६४, कळमनुरी ४२, वाकोडी ४५, कुरुंदा ५०. 

विदर्भ :  रोहिणखेड ६९, पिंपळगाव ६०, बाळापूर ९०, वाडेगाव १६०, पातूर ६८, बाभूळगाव १४६, आलेगाव ८०, चान्नी ८०, केनवड ६३, गोवर्धन ८२, चांडस ८६, शेंबळ ६३, रिसा ६०, मारेगाव ९०, मिटेवणी ६८, गाऱ्हा ६०, आकोडी ७७, रत्नारा ८८, दासगाव १००, रावणवाडी १०५, गोंदिया ९१, कामठा १९६, काट्टीपूर ११५, आमगाव १०१, ठाणा ६८, तिरोडा ७६, वाडेगाव ६८, ठाणेगाव ६६, कुऱ्हाडी ७४, सालकेसा ७२, सडक अर्जुनी ९०, मूल ६६, गोंडपिंपरी ८२, धाबा ८०, खांबडा ६०, चिकनी ७८, कोपर्णा ११३, पाेंभुर्णा ७६, कुरखेडा ७३, पिसेवढथा ६४, सिरोंचा ६५, पेंटीपका ६४.  

कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा मॉन्सून सक्रीय झाल्याने कोकणात धो धो पाऊस पडत आहे. आज (ता. १०) कोकणासह, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे, तर विदर्भ, मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

उजनीच्या पाणीसाठ्यात दोन टीएमसी वाढ  पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. मागील वर्षी धरण १०० टक्‍यांहून अधिक भरले होते. मात्र, उन्हाळी हंगामासाठी धरणातून पाणी सोडल्यामुळे धरणाची पाणीपातळी वजामध्ये गेली आहे. वजा १९ च्या पुढे धरणाची टक्केवारी गेली होती. मात्र, मागील एक-दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात व धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणात १.८५ टीएमसी इतक्‍या पाण्याची वाढ झाली असून, धरणाची पाणीपातळी वजा १६.३७ टक्के होती. २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे   वसई २३५, अगशी २४७, निर्मल २२७, विरार २७६, माणिकपूर २१२, डहाणू २२८, मल्याण २२०, चिंचणी २९१, पालघर २२० (सर्व पालघर), मुरूड २२०, म्हसळा २३०, खामगाव २४१ (सर्व रायगड). 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com