agrowon news in marathi, The rain on Marathwada still remains the same | Agrowon

मराठवाड्यावर पाऊस अद्याप रुसलेलाच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाची बेपर्वाई कायम आहे. त्यामुळे खरिपाची पिके कोमेजून चालली अाहेत. एकूण ७६ तालुक्‍यांपैकी तब्बल ६५ तालुक्‍यांत आजपर्यंत अपेक्षित पाऊसच पडला नाही. यापैकी ९० मंडळांत तर अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस पडला नसून १३३ मंडळांतील पावसाचा टक्‍का ७५ च्या आत राहिल्याची स्थिती आहे. पावसाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी केवळ ८० मंडळ अपेक्षित पावसाच्या कसोटीवर पास असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाची बेपर्वाई कायम आहे. त्यामुळे खरिपाची पिके कोमेजून चालली अाहेत. एकूण ७६ तालुक्‍यांपैकी तब्बल ६५ तालुक्‍यांत आजपर्यंत अपेक्षित पाऊसच पडला नाही. यापैकी ९० मंडळांत तर अपेक्षेच्या ५० टक्‍केही पाऊस पडला नसून १३३ मंडळांतील पावसाचा टक्‍का ७५ च्या आत राहिल्याची स्थिती आहे. पावसाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी केवळ ८० मंडळ अपेक्षित पावसाच्या कसोटीवर पास असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्‍यात आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३५ टक्‍के पाऊस पडला. त्यापाठोपाठ कन्नड तालुक्‍यात ४१ टक्‍के, वैजापूर तालुक्‍यात ४९ टक्‍केच पाऊस पडला. जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्‍यात केवळ ४७ टक्‍के, तर भोकरदन तालुक्‍यात पावसाने अपेक्षेचा निम्मी सरासरी कशीबशी गाठली. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्‍यात पावसाची स्थिती बिकट आहे. या तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत ४१ टक्‍के पाऊस झाला. धारूर तालुक्‍यात ५० टक्‍के, शिरूर कासार तालुक्‍यात ५६ टक्‍के, परळी, वडवणी तालुक्‍यात ५७ टक्‍केच पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५३ टक्‍के पाऊस झाला.

सात तालुक्‍यांत ५० टक्‍केही पाऊस नाही
मराठवाड्यातील सात तालुक्‍यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस झाला नाही. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, कन्नड, खुलताबाद, गंगापूर, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद, नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्‍याचा समावेश आहे.

केवळ ११ तालुक्‍यांत अपेक्षित पाऊस
मराठवाड्यातील केवळ ११ तालुक्‍यांत आजपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत पाऊस झाला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तब्बल आठ तर परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका तालुक्‍याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, हदगाव, हिमायतनगर, परभणीतील पुर्णा, हिंगोलीतील कळमनुरी, लातूरमधील निलंगा तालुक्‍याचा यामध्ये समावेश आहे.

राजुरी मंडळात केवळ ४५ मिलिमीटर पाऊस
बीड जिल्ह्यातील बीड तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या राजुरी मंडळात आजपर्यंत २६८ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. त्या तुलनेत आजपर्यंत केवळ ४५ मिलिमीटर पाऊस झाला. नाळवंडी मंडळात ७३ मिलिमीटर, पेंडगाव मंडळात ३० मिलिमीटर, गेवराई तालुक्‍यातील चकलांबा मंडळात ६९ मिलिमीटर, उमापूर मंडळात ७९ मिलिमीटर, परळी तालुक्‍यातील धर्मापुरी मंडळात ७८ मिलिमीटरच पावसाची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील निल्लोड मंडळात ६९ मिलिमीटर, बोरगाव बाजार मंडळात ६५ मिलिमीटर, कन्नडमधील चिकलठाणा मंडळात ७६ मिलिमीटर, गंगापूरमधील भेनडाला मंडळात ६६ मिलिमीटर पावसाची नोंद घेतली गेली.


इतर बातम्या
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...