agrowon news in marathi, rain open in state, Maharashtra | Agrowon

राज्यात पावसाची उघडीप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

पुणे : मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामान असल्याने दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. तर, उन्हाचा चटकाही वाढू लागल्याने घसरलेला तापमानाचा पारा पुन्हा वर जाऊ लागला आहे. बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.    

पुणे : मॉन्सूनचा प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामान असल्याने दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. तर, उन्हाचा चटकाही वाढू लागल्याने घसरलेला तापमानाचा पारा पुन्हा वर जाऊ लागला आहे. बुधवारी (ता.१३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये जळगाव येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.    

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, प्रवाह थंडावल्याने मॉन्सूनची वाटचालही थांबली असून, पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. राज्यात तळकोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मंगळवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात दखलपात्र पावसाची नोंद झालेली नाही. ढगाळ हवामानामुळे तापमानाचा पारा सरासरीच्या खाली असला, तरी पावसाने उघडीप देताच, तापमानात हळूहळू वाढ होत आहे. 

बुधवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.३, जळगाव ३९.२, कोल्हापूर ३१, महाबळेश्वर २१, मालेगाव ३८.०, नाशिक ३३, सातारा ३१, सोलापूर ३५, मुंबई ३३.५, अलिबाग ३४, रत्नागिरी ३१.७, डहाणू ३४.०, आैरंगाबाद ३५.१, परभणी ३५.९, नांदेड ३५.५, अकोला ३९.०, अमरावती ३६.४, बुलडाणा ३८.०, ब्रह्मपुरी ३५.३, चंद्रपूर ३६.६, गोंदिया ३६.३, नागपूर ३५.७, वर्धा ३५.०, यवतमाळ ३४.५. 

इतर अॅग्रो विशेष
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
बाजारातील ‘वाळवी’सुमारे अडीच वर्षांपूर्वी सांगली येथे एक कोल्ड...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
नीलक्रांतीसाठी करूया तिलापिया संगोपन तिलापिया मासा आणि त्याच्या प्रजातींना संपूर्ण...
मराठवाड्यात पावसाअभावी पिके संकटातऔरंगाबाद : मराठवाड्यात १ जून ते १४ जुलैदरम्यान...
खरिपावर दुष्काळाचे सावट गडदपुणे ः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग...
चोवीस जिल्ह्यांत कमी पाऊस पुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सरींची वाणवा,...
उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : जवळपास आठवडाभर उघडीप दिल्यानंतर राज्यात...
राज्यात पस्तीस हजार हेक्टर डाळिंब बागा...सांगली ः गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे...
देशात २४ राज्यांमध्ये पावसात तूटपुणे ः देशात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला असून,...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...