कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार; माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार; माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोर वाढणार; माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा

पुणे  : मॉन्सून सक्रिय होऊ लागल्याने कोकण किनारपट्टीवर पावसाने जोर धरला अाहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. आज (ता. १९) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिली आहे; तर बुधवारी (ता.२०) गुरुवारी (ता.२१) कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी; तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये काही ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. रायगडमधील मुरूड येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उरण, म्हसळा, पेण, रोहा, श्रीवर्धन, अलिबाग, गुहागर, रत्नागिरी, हर्णे येथे पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा, कोल्हापूर, नाशिक, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातही पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असला तरी, बहुतांश ठिकाणी मुख्यत: कोरडे हवामान होते.मध्य महाराष्ट्रातील तापमानात काहीशी घट झाली; तर विदर्भात तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास आहे. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर येथे उच्चांकी ४०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्राेत- हवामान विभाग) :  कोकण : मुरूड २१०, उरण १४०, म्हसळा, पेण, रोहा, श्रीवर्धन प्रत्येकी १३०, अलिबाग, गुहागर, रत्नागिरी प्रत्येकी ११०, हर्णे १००, ठाणे ९०, बेलापूर, चिपळूण, कर्जत, मालवण, वैभववाडी प्रत्येकी ८०, देवगड, खेड, मंडणगड, माणगाव, राजापूर प्रत्येकी ७०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर ५०, गगणबावडा ४०, लोणावळा, ओझरखेडा प्रत्येकी ३०. घाटमाथा : अंबोणे ७०, भिरा, भिवापुरी, डुंगरवाडी, कोयना नवजा, ताम्हिणी, खोपोली प्रत्येकी ४०. शिरगाव, दावडी, कोयना पोफळी प्रत्येकी ३०.मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : विहार १३०, तुलसी ८०, तानसा ४०. माॅन्सूनच्या प्रगतीची प्रतीक्षा नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (माॅन्सून) महाराष्ट्रातील वाटचाल ११ जूनपासून जैसे थे आहे. ११ जून रोजी विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात दाखल झालेल्या मॉन्सूनची कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ९ जूनपासून कोणतीही प्रगती झालेली नाही. माॅन्सूनचे प्रवाह मंदावल्याने आणखी पाच ते सहा दिवस मॉन्सूनची वाटचाल होणार नसल्याने पुढील प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com