राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा

राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा

पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. आज (ता. १५) हे कमी दाबाचे क्षेत्र ठळक होऊन मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जाेर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, सोमवारी (ता. १६) पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.    शुक्रवारी (ता. १३) बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र ठळक होत आहे. यातच महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा स.िक्रय असल्याने रत्नागिरीसह कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. 

नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारी (ता. १४) राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. गुरुवारी (ता. १९) बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. दुपारनंतर पूर्व विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात ढगांनी दाटी केली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडला. तर, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडला.    दरम्यान, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाचा जोर कायम होता. सांगली जिल्ह्यातील संततधार पावसामुळे वारणेच्या पाणीपातळीत वाढ होऊन, मिरज तालुक्‍यातील दूधगाव-खोची बंधारा पाण्याखाली गेला. तर, नवेखेड येथे कृष्णा नदीतील पाणीपातळी वाढल्याने बहे येथील बंधारा पाण्याखाली गेला. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, कराड या तालुक्‍यांत पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील गिरणा खोऱ्यातील पुनंद परिसरात संततधार पावसाने पुनंद धरण भरले आहे. धरणातून अठराशे क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होऊ लागल्याने गिरणा नदीला पूर आला आहे. नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रातून पाण्याचा प्रवाह वाढल्याने धरणाचे १० दरवाजे पूर्णतः उघडे असून, १६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत.

शुक्रवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्त्रोत कृषी विभाग)

कोकण : गोरेगाव १०७, नेरळ १०३, कळंब ९५, पेण १२६, कसू १०५, खारवली ९०, चिपळूण ११०, खेरडी ११२, मार्गतम्हाणे १००, रामपूर ९०, वाहल ९८, सावरडे ९७, असुरडे १०५, कळकवणे १२३, शिरगाव ९८, दाभोळ ९१, वेलवी ९७, खेड १०२, अंबवली ९४, कुलवंडी १२१, धामनंद १२०, तलवली ९६, कडवी ९७, मुरडव १०५, माखजन १११, फुंगुस ९६, फनसावणे ११३, अंगवली ९३, कोडगाव १९५, देवली १६५, देवरुख ९७, तुलसानी २२८, माभले ९३, तेरहे १११, सवंडल ११२, ओनी १३२, पाचल १३३, भांबेड ११३, पुनस १३०, विलवडे ११५, कसाल ९५, साइवन ११०, तलासरी १३३, झरी १२९. 

मध्य महाराष्ट्र : हेळवाक १०५, मरळी ४२, मोरगिरी ७१, महाबळेश्‍वर ११८, तापोळा ९५, लामज १२१, शिरसी ४२, चरण ५६, कळे ४४, पडळ ४९, बाजार ५६, कोतोली ४९, करंजफेन ११६, मलकापूर ५३, आंबा १३४, राधानगरी ११५, कसबा ६०, गगनबावडा ५३, साळवण १५१, सांगरूळ ४८, कसबा बीड ५१, हळदी ४१, कडेगाव ४५, कराडवाडी ५८, आजरा ४९, गवसे ९८, चंदगड ६६, हेरे ४५. 

मराठवाडा : शिरूर कासार २१, सालगारा २८, मंगरूळ २३, उस्माननगर २१, कलंबर ४४, देहेली ३२, माहूर ३०, वानोळा ४५, वाई ३२, सिंदखेड ५७. 

विदर्भ : गिरोली ३५, चांदूरबाजार २२, तळेगाव २२, कळगाव ३३, अर्णी २९, जवळा २९, लोनबेहल २३, सावळी ५७, अंजनखेड ४४, शेंबळ ३८, ब्राह्मणगाव २४, जांब २१, वरूड २२, कळी ३३, शिंदोळा २०, कायार ४४, झारी झामनी ७९, खडकडोह ६५, मुकुटबन ७०, मथार्जून ९७, शिबला ३९, पांढरकवडा ३७, पाटणबोरी २०, पाहापळ ४८, चालबराडी ५७, शिरोली ४०, साखरा ४२, पारवा ५४, कुर्ली ५२, शिखारीटोळा ३६, कोपर्णा ६३, गडचांदूर ४४, बल्लारपूर २१, पोंभुर्णा २१, पाटण २१, आष्टी ३६, येनापूर ४८, असारळी ३७, आहेरी २९, जिमलगट्टा २१, अल्लापाल्ली ४३, पेरमिली ३९, एटापल्ली २४, कासंसूर २८, जरावंडी २५, गाट्टा २९, पेंढरी ५२, मुलचेरा ३४, तरडगाव ४२, भामरागड ४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com