सर्वदूर पावसाचा अंदाज

शिराळा तालुक्‍यात संततधार पाऊस सुरू असल्याने भात पिकात साचलेले पाणी.
शिराळा तालुक्‍यात संततधार पाऊस सुरू असल्याने भात पिकात साचलेले पाणी.

पुणे : आजपासून (ता. १४) राज्यात सर्वदूर पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारपासून (ता. १५) राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, कोकणासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर सोमवारपासून (ता. १६) मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासंमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गुरुवारी (ता. १२) कोकणात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. साताऱ्यातील हेळवाक येथे २४ तासांतील सर्वाधिक १९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  विदर्भातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर मराठवाड्यात हलक्या पावसाने हजेरी लावली.  

संततधार पावसामुळे साताऱ्यातील मराठवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून, पाण्याच्या फुगवट्यामुळे बुडीत क्षेत्रातील उमरकांचन, मेंढ आणि घोटील ही गावे कोंडीत सापडली आहेत. मेंढमध्ये ज्योतिर्लिंग मंदिर परिसराला पडलेला पाण्याचा वेढा दिला आहे. घोटील येथील गावाचा संपर्क तुटला. सांगलीतील शिराळा तालुक्‍यात संततधार पावसाने भातपिकात पाणी साचले. चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीचे पात्राबाहेर आले होते. कोल्हापूर जिल्ह्यात कसबा बावडा येथे सततच्या पावसाने पंचगगा नदीने असे विराट रूप धारण केले. पन्हाळा तालुक्यातील माजगाव पोर्ले मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद झाला. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर असणाऱ्या मंदिरात शुक्रवारी (ता. १३) सकाळी पाण्याने प्रवेश केला.

शुक्रवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये - स्रोत कृषी विभाग)

कोकण : महाड ११३, तुडील ८९, खामगाव ८३, चिपळूण ८५, खेरडी ९३, मार्गतम्हाणे ९०, रामपूर ८०, वाहल ९५, सावर्डे ८४, कळकवणे १३५, शिरगाव १०५, वाकवली ९०, खेड ८५, आंबवली ८८, कुलवंडी ८९, धामनंद ९२, देव्हरे ९१, खेडशी ८९, फांसोप ८०, पाली ८४, फनसावणे ११२, अंगवली १०१, कोडगाव १५१, देवली १३२, देवरुख १४१, तुलासणी ८७, माभले १००, तेरहे ८२, सवंडल १०५, पाचळ ८६, लांजा १८७, भांबेड १६७, पुनस ११४, सातवली ९३, विलवडे १८५, अंबोली १६०, साखर १२४. 

मध्य महाराष्ट्र : उभेरठाणा ९४, बाऱ्हे ९२, मानखेड ८८, सुरगाणा १४६, नाणशी ७७, कोशिंबे ५१, इगतपुरी ६५, धारगाव ८५, पेठ ७०, जागमोडी ८०, वेळुंजे ५३, हर्सूल ८१, चिंचपाडा ६५, शेंडी ७४, माले ७८, मुठे १०३, भोलावडे १३५, संगमनेर ५४, निगुडघर ५८, काले १५४, कार्ला १०४, खडकाळा ५७, लोणावळा ८०, वेल्हा ६३, पानशेत ५३, राजूर ५९, कुडे ५६, वर्ये ५५, आंबवडे ५८, दहिवड ५४, परळी ५३, पाटण ८७, म्हावशी ८४, हेळवाक १९५, मरळी ९३, मोरगिरी ११०, महाबळेश्‍वर १७१, तापोळा १८३, लामज १९५, कोकरूड ६९, शिरसी ५८, मांगले ५३, सागाव ५४, चरण ८४, वाडी-रत्नागिरी ५५, कळे १२२, पडळ ७१, बाजार १३६, कोतोली ८०, भेडसगाव ५७, बांबवडे ५३, करंजफेन ११३, सरूड ६४, मलकापूर ८६, आंबा ११९, राधानगरी १३२, सरवडे ६६, कसबा ८९, आवळी ७८, राशिवडे ६३, कसबा ५९, गगनबावडा ७२, साळवण १९३, करवीर ६६, निगवे ६८, शिरोली-दुमाला ७५, कसबा बीड ५४, बालिंगा ७१, केनवडे ७७, गारगोटी ६०, पिंपळगाव ९६, कडेगाव ७०, कराडवाडी ८२, गवसे ८५, चंदगड १३१, नारंगवाडी ७२, तुर्केवाडी ५२, हेरे १०८.

मराठवाडा : बाभळगाव २५, मुरूड २१, चिंचोली २०, शिरूर अनंतपाळ २०, बासंबा २९, दिग्रज २६, डोंगरकडा २१, 

विदर्भ : शेगाव ४८, उरळ ५८, निंबा ५६, हातरुण ७८, अकोला ४७, माना ४३, रामतीर्थ ४६, बाभूळगाव ५९, नागरधन ४५, मुसेवाडी ६०, कोडामेंडी ७२, भंडारा ४५, धारगाव ५१, खामारी ४३, केरडी ४१, नाकडोंगरी ४५, तुमसर ४०, शिवरा ४७, रत्नारा ५५, कामठा ४९, परसवाडा ७०, वाडेगाव ५३, गोरेगाव ४२, चिंचगड ६९, सडक अर्जुनी ४९, भद्रावती ५५, धोडपेठ ४६, सिरोंचा ४२, कोर्ची ७२, बेडगाव ७१, कोटगुळ ६७, शंकरपूर ४०.

कमी दाबक्षेत्राची निर्मिती उत्तर ओडिशा आणि परिसरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात शुक्रवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली. सर्वसाधारण स्थितीवर असलेला माॅन्सूनचा अास पाच ते सहा दिवस सक्रिय राहण्याची शक्यता अाहे. तर गुरुवारपर्यंत (ता. १९) बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com