सांगली जिल्हा परिषदेत शुकशुकाट

सांगली जिल्हा परिषदेत शुकशुकाट
सांगली जिल्हा परिषदेत शुकशुकाट

सांगली : जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मंगळवारी (ता. ७) एकदिवसीय लाक्षणिक संप केला. संपात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सुमारे दोन हजार कर्मचारी सहभागी झाले होते. 

सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी विविध संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर कराव्यात. दिवाळीपूर्वी सातवा वेतन आयोग आश्‍वासन दिल्याप्रमाणे लागू करावा. तत्पूर्वी गणेशोत्सवात २५ हजार रुपये अग्रीम म्हणून द्यावे. २००५ नंतर शासन सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. आकृतिबंध सुधारणा करण्याच्या नावाखाली वर्ग तीन व चारची पदे कमी करण्याचा घाट घातला आहे, तो थांबवावा. 

जिल्हा परिषदेमध्ये करारावर किंवा कंत्राटी पद्धतीने दिलेल्या नेमणुका शासनाने नियमित कराव्यात. ग्रामविकास विभागाच्या अधिकारावर अतिक्रमण होऊ नये. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता जानेवारी २०१६ पासून द्यावा. अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी त्वरित शासन निर्णय व्हावा. यासह २३ मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने आज लाक्षणिक संप पुकारला. निदर्शनानंतर शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.  युनियनच्या संपात विविध संघटनांचा सहभाग होता.

युनियनचे जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, कार्याध्यक्ष अशोक पाटील, दत्तात्रेय शिंदे, बजरंग संकपाळ, निळकंठ पट्टणशेट्टी, दादासाहेब पाटील, उज्ज्वला हिप्परकर, गीता शेंडगे, शुभदा चिटणीस, वीणा शिंगाडे, विद्या पाटील, धोंडिराम बेडगे, दत्ता पाटील, लक्ष्मण माने, एस. एल. कुंभार, मोहन गोसार्डी, चंद्रकांत दबडे आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com