कर्जमाफीबाबत सरकारीची नियत चांगली नाही : शरद पवार

कर्जमाफीबाबत सरकारीची नियत चांगली नाही : शरद पवार
कर्जमाफीबाबत सरकारीची नियत चांगली नाही : शरद पवार

पुणे ः माेदी सरकारविराेधात समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे. राज्य सरकारने ३५ हजार काेटींची कर्जमाफी केली मात्र, अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून सरकारची नियत चांगली नसल्याचे स्पष्ट हाेत अाहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.  राष्ट्रवादी काँग्रेसचा १९ व्या वर्धापन दिन आणि हल्लाबाेल आंदाेलनाच्या पश्‍चिम महाराष्‍ट्राच्या सांगता सभेत शरद पवार रविवारी (ता.१०) बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, अजित पवार, विजयसिंह माेहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मधुकर कुकडे, वंदना चव्हाण, प्रफुल्ल पटेल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित हाेते.  श्री. पवार म्हणाले, की महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युती सरकारने ३५ हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली. पण अद्याप ५० टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. यावरून सरकारची नियतच चांगली नसल्याचे स्पष्ट दिसते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात कोणीही विरोधी पक्षनेता नव्हता, तरीही समविचारी पक्ष एकत्र आले आणि जनता पार्टीची सत्ता आणली. त्यामुळे देशात पर्याय देण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येण्याची मानसिकता झाली आहे. यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून, त्याची प्रक्रिया मी सुरू केली आहे. या प्रक्रियेत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी व्हावे. ‘‘यापूर्वी मतदानाची शंका काेण घेत नव्हते. मात्र आता शंका येऊ लागली आहे. मतदानासाठी मशिनच्या वापरातून निवडणुका जिंकायचे हे भाजपचे सूत्र आहे. भाजप सोडून सर्व पक्षांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे, आपण एकत्र येऊ निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि इथून पुढे मशिनचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनुसार मतदान घ्या, अशी मागणी करू. तसच धमकीचं पत्र आल्यावर माध्यमांशी बोलत नाही. त्यावर कायदेशीरपणे कारवाई केली जाते. त्यामुळे ही धमकी खरीच आहे का की धमकीच्या पत्रावरून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे, असा संशय श्री. पवार यांनी व्यक्त केला.  धनंजय मुंडे म्हणाले, की माेदी सरकारच्या यशाेगाथेची माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा मान्यवरांना देत आहेत. मात्र पेट्राेल, डिझेल, गॅस दरवाढीची झळ ज्यांना बसत नाही अशा मान्यवरांना ते भेटत आहेत. आपण सरकारच्या अपयशगाथेची पुस्तिका घेऊन सर्वसामान्यांपर्यंत जाऊ, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पुढील वर्धापन दिन आपण सत्तांतर करून साजरा करू. या वेळी जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, हसन मुश्रीफ, अण्णा डांगे, खासदार वंदना चव्हाण, मधुकर कुकडे यांनी मनाेगत व्यक्त केले.    भुजबळ म्हणाले

  •  माझा न्यायदेवतेवर विश्वास होता आहे आणि तो राहील.  
  •  स्वत:ला निर्दोष सिद्ध करणार. 
  •  बचेंगे तो और भी लडेंगे..., हम बचे भी है... और लढते रहेंगे 
  •  राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सोडणार नाही
  •  महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराची नियुक्ती मी केलेली नाही. 
  •  मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा, पाठिंब्यासाठी आेबीसींसह माेर्चात उतरणार
  •  सर्वच शेतमालावरील निर्यात बंदी उठवा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com