agrowon news in marathi, shortage of export quality banana, Maharashtra | Agrowon

राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा
चंद्रकांत जाधव
गुरुवार, 19 जुलै 2018

राज्यात सध्या निर्यातक्षम केळी फारशी उपलब्ध होत नाही. अधिक दर देऊनही अनेकदा केळी मिळत नाही. यामुळे परदेशातील निर्यातीवर परिणाम झाला आहे. 
- प्रशांत धारपुरे, केळी निर्यातदार
 

जळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण झाला असून, केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून आखातातील किंवा परदेशातील केळी निर्यात मागील २० दिवसांपासून बंद झाली आहे. सध्या फक्त अकलूज, टेंभूर्णी (जि. सोलापूर) येथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत असल्याची माहिती केळी व्यापारातील अभ्यासकांनी दिली आहे. 

अकलूज व टेंभूर्णी येथे काही कंपन्या परदेशात केळी निर्यातीसाठी काम करीत असून, तेथून प्रतिदिन चार कंटनेर केळीची निर्यात परदेशात सुरू आहे. निर्यातक्षम केळीला १३५० रुपयांपर्यंत दर सध्या मिळत आहे. मध्यंतरी केळी मिळतच नव्हती, त्यामुळे निर्यातदारांना जादा दर द्यावे लागले. रावेर, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील केळी निर्यात मागील मागील २० दिवसांपासून बंद झाली आहे.

परिणामी केळीच्या दरांवर दबाव आहे. कुठलीही दरवाढ किंवा दरांमधील सुधारणा जळगाव जिल्ह्यात मागील २० ते २५ दिवसात झालेली नाही. सध्या रावेरातील निंभोरा, केऱ्हाळे, कर्जोद, रसलपूर, चिनावल, निंबोल, विटवा आदी भागात केळी उपलब्ध होत आहे. तर यावल तालुक्‍यातील सांगवी बुद्रुक, भालोद, साकळी भागात केळीचा पुरवठा सुरू आहे. ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळत आहे. नवती बागांमधील कापणी अंतिम टप्प्यात आहे. तर चोपडा, जळगाव, जामनेर, भडगाव भागात कांदेबागांची कापणी ऑक्‍टोबरच्या सुरवातीला सुरू होईल. 

 जून महिन्यातील वादळी पाऊस आणि तापमान यामुळे केळीच्या दर्जावर परिणाम झाला. घडांवरील स्कर्टिंग बॅगही वादळाने फाटल्या. रावेर व यावलमध्ये पंजाब, काश्‍मीर व दिल्ली येथे बॉक्‍समध्ये पाठवणुकीची केळी मिळणेही दुरापास्त होऊ लागले आहे. मागील महिन्यात प्रतिदिन १२ ते १३ ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) बॉक्‍समधील केळीची पाठवणूक काश्‍मीर, पंजाब व दिल्ली येथे होत होती. ती सध्या फक्त प्रतिदिन आठ ट्रक एवढीच होत आहे.

मध्यंतरी काही केळी निर्यातदारांनी रावेरात पाहणी केली, परंतु केळी निर्यातीचे सौदे होऊ शकले नाहीत. शहादा (जि. नंदुरबार) येथून जूनमध्ये प्रतिदिन एक कंटेनर केळीची निर्यात आखातात झाली. तेथूनही सध्या निर्यात बंद झाली आहे, कारण शहादा तालुक्‍यातील जवखेडा, ब्राह्मणपुरी, खेड तसेच नजीकच्या मध्य प्रदेशातील खेतिया भागातील निर्यातक्षम केळीची कापणी पूर्ण झाली आहे. अकोट (जि. अकोला) येथील केळी निर्यातही बंद झाल्याची माहिती मिळाली. जूनच्या मध्यापूर्वी राज्यातून प्रतिदन आठ ते नऊ कंटेनर केळीची परदेशात केळी निर्यात होत होती. या महिन्यात मात्र प्रतिदिन चार कंटेनर केळी निर्यात सुरू आहे. तीदेखील पुढे कमी होण्याची शक्‍यता आहे. 

रावेरातून सहा महिन्यांत ३६० कंटेनरची निर्यात
रावेर तालुक्‍यातून जानेवारी ते जून या दरम्यान परदेशात ३५० कंटेनर (एक कंटेनर २० मेट्रिक टन क्षमता) केळीची निर्यात झाली. तांदलवाडीसह निंबोल, केऱ्हाळे, मस्कावद, वाघोदा येथे निर्यातक्षम केळी उपलब्ध होत होती. तांदलवाडीमधून सर्वाधिक निर्यातक्षम केळी उपलब्ध झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

इतर अॅग्रो विशेष
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...