agrowon news in marathi, shortage possibilities of deshi cotton seed, Maharashtra | Agrowon

देशी कापूस बियाण्यांच्या तुटवड्याची मोठी शक्यता
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 मे 2018

आमच्याकडे शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची तयारी केली आहे. ठिबक अंथरण्याचे काम अनेक शेतकऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यात मात्र अजूनही कोणतेही कापूस बियाणे आलेले नाही. लागवड सुरू झालेली नाही; परंतु पुढील आठवड्यात मात्र शेतकरी प्रतीक्षा करणार नाहीत, असे वाटते. 
- अतुल मधुकर पाटील, शेतकरी, केऱ्हाळे, ता. रावेर, जि. जळगाव.
 

जळगाव  : कापूस लागवडीत राज्यात क्रमांक एक असलेल्या जळगाव जिल्ह्यात तापीकाठासह कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये देशी संकरित व देशी सुधारित कापूस वाणांची मागणी वाढली आहे. यंदा सुमारे दोन ते सव्वादोन लाख देशी कापूस बियाण्याच्या पाकिटांची मागणी आहे. परंतु खासगी कंपन्या व इतर पुरवठादारांकडून फक्त २० हजार पाकिटे उपलब्ध होणार आहेत. अर्थातच बियाण्याची टंचाई निर्माण होईल, हे स्पष्ट झाले असून, यामुळे बियाण्यांचा काळाबाजार वाढण्याची शक्‍यता शेतकरी व बियाणे बाजारातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख २० हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड केली जाते. यंदा कापसाच्या क्षेत्रात घट होईल, असा अंदाज आहे. परंतु मॉन्सूनची स्थिती चांगली राहील, असे तूर्त तरी सांगितले जात असल्याने पूर्वहंगामी कापूस लागवडीत फारशी घट होणार नाही. तसेच कोरडवाहू कापूस लागवडही सर्वसाधारण क्षेत्राएवढी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा पूर्वहंगामी व कोरडवाहू मिळून सुमारे चार लाख ७० हजार हेक्‍टरवर कापूस लागवड होऊ शकते. यात यंदा देशी सुधारित व देशी संकरित कापूस बियाण्याची मागणी अधिक दिसत आहे. कारण धुळ्यासह रावेर, शिरपुरातील अनेक देशी कापूस उत्पादकांना गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झालेला असताना देशी कापसाचे उत्पादन बऱ्यापैकी आले. रावेरात देशी कापसाची पूर्वहंगामी लागवड केली जाते.

बेवड म्हणून रावेर, यावल, चोपडा भागात देशी कापूस लागवड अधिक असते. शिरपूर, शहादा व तळोदा येथेही पूर्वहंगामी कापूस लागवडीत देशी कापूस बियाण्यास शेतकरी पसंती देतात. 
एकट्या जळगाव जिल्ह्यात सुमारे दोन लाख पाकिटे एवढी देशी कापूस बियाण्यांची मागणी आहे. तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातही देशी कापूस वाणांची सुमारे ३५ ते ४० हजार पाकिटांची मागणी आहे.

परंतु देशी कापूस बियाणे अजूनही उपलब्ध झालेले नाही. तर बीटी कापूस बियाणेही २० मेनंतर येईल, असे सांगितले जात आहे. जेवढी मागणी देशी कापूस बियाण्यांची आहे, तेवढे मिळणार नाही, असे कृषी विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसत आहे. कृषी विभागाने बीटी कापूस बियाण्यांची लागवड अधिक असते या दृष्टीने कापूस बियाणे पुरवठ्याचे नियोजन केले आहे. यानुसार जळगाव जिल्ह्यात २३ लाख ६० हजार कापूस बियाण्यांची पाकिटे मिळणार आहेत. त्यात फक्त २० हजार पाकिटे ही देशी कापूस बियाण्यांची असतील. 

धुळ्यात साडेआठ लाख पाकिटे येतील. यात देशी कापूस बियाण्यांची सुमारे १० हजार पाकिटे मिळण्याची शक्‍यता आहे. तूर्त तरी पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू झालेली नाही. परंतु शेतकऱ्यांनी शेतात मशागत करून ठिबक अंथरून ठेवली आहे. रावेर, यावल व मुक्ताईनगरमधील तापीकाठावर पूर्वहंगामी कापसासंबंधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. यातच जिल्ह्यात बियाणे अजूनही आलेले नाही.

कापसाचा हंगाम लांबणीवर पडू नये म्हणून शेतकरी गुजरात, मध्य प्रदेशातून कापूस बियाणे मिळेल का, या संदर्भात चाचपणी, चौकशी करू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी मध्य प्रदेशातील खरगोन, बऱ्हाणपूर, बडवानी भागात कापूस बियाण्यांसंबंधी जात आहेत. तर धुळे व नंदुरबारमधील शेतकरी गुजरातमधील निझर, वाका चार रस्ता भागात देशी व इतर कापूस बियाण्यांसंबंधी जात आहेत. धुळ्यातील काही शेतकरी इंदूर, सेंधवा, बडवानी येथून कापूस बियाणे आणण्याच्या तयारीत आहेत. यामुळे पुढील आठवड्यात जिल्ह्यात बीटी व नॉन बीटी कापूस बियाण्याचा काळा बाजार फोफावण्याची शक्‍यता आहे. 

प्रतिक्रिया
देशी कापूस बियाणे मागणी वाढत आहे. आपण या बियाण्यांची 
अधिक मागणी केली आहे. काही कंपन्यांनी पुरवठ्याची तयारी दाखविली आहे. जेवढे अधिक देशी कापूस बियाणे उपलब्ध करता येईल, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. पुरवठ्यासंबंधीचे अधिकार शासन व पुरवठादार यांच्याकडे आहेत. अशात शेतकऱ्यांनी मात्र विनापावती, अनधिकृत संस्था, व्यक्तींकडून कापूस बियाणे खरेदी करू नये. बियाणे बोगस निघाले तर त्याची जबाबदारी शेतकऱ्याचीच असेल. 
- मधुकर चौधरी, 
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव.
 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...