शेतकरीप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : किसान समिती

शेतकरीप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : किसान समिती
शेतकरीप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा : किसान समिती

नवी दिल्ली  ः देशात सतत वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि इतर शेतीसंबंधी समस्यांनी शेतकऱ्यांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे. या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली.  व्ही. एम. सिंग (निमंत्रक), माजी खासदार हसन मोल्ला, खासदार राजू शेट्टी, माजी आमदार डॉ. सुनीलम, अतुल अंजन, योगेंद्र यादव आदी किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट सोमवारी (ता. २८) घेतली. या वेळी सदस्यांनी राष्ट्रपतींशी देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा केली. समितीचे सदस्य अतुल अंजन म्हणाले, की किसान संघर्ष समन्वय समितीच्या सदस्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि इतर शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी निवेदन देण्यात आले. तसचे शेतकरी आत्महत्या आणि इतर शेतीसंबंधी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे.  राष्ट्रपतींची चर्चा केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी सांगितले, की राष्ट्रपती यांनी समितीचे म्हणणे सविस्तरपणे ऐकले आणि मागण्यांसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या समस्या कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी देशातील १९३ शेतकरी संघटना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीशी जोडल्या गेल्या आहेत. देशातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी १० हजार किलोमीटरचा प्रवास करून, शेतकऱ्यांशी ५०० बैठका घेऊन किसान संघर्ष समितीने दोन उपाय प्रभावीपणे मांडले आहेत. कर्जापासून मुक्त आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त किमान भाव मिळण्याची शाश्वती, असे दोन उपाय शेतकऱ्यांच्या समस्येवर प्रभावी ठरू शकतात, असे आम्ही पत्रात म्हटले आहे.   ‘‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर मागील चार वर्षांत देशातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिघडतच आहे. पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या समस्यांना गांभीर्याने पाहत नाहीत. शेतकऱ्यांना भाजप सरकारच्या काळात नुकसानभरपाईसुद्धा वेळेत मिळत नाही,’’ असे शेतकरी नेते थेटे म्हणाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com