agrowon news in marathi, two farmers proposal for variety right, Maharashtra | Agrowon

वाण हक्कासाठी प्रथमच दोन शेतकऱ्यांचे प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे : पीक वाण शेतकरी हक्क कायद्यानुसार राज्यातील दोन शेतक-यांच्या वाणाला (पेटंट) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याबाबत प्राथमिक माहितीचे प्रस्ताव दिल्लीतील पीक वाण शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे पाठविण्यात आलेले आहेत. 

पीक वाण शेतकरी हक्क कायदा २००१ मध्ये तयार झाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २००५ मध्ये स्वतंत्र प्राधिकरण सुरू करण्यात आले. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून राज्यातील शेतक-यांसाठी पुण्यात या प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. 

पुणे : पीक वाण शेतकरी हक्क कायद्यानुसार राज्यातील दोन शेतक-यांच्या वाणाला (पेटंट) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. याबाबत प्राथमिक माहितीचे प्रस्ताव दिल्लीतील पीक वाण शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे पाठविण्यात आलेले आहेत. 

पीक वाण शेतकरी हक्क कायदा २००१ मध्ये तयार झाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २००५ मध्ये स्वतंत्र प्राधिकरण सुरू करण्यात आले. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून राज्यातील शेतक-यांसाठी पुण्यात या प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. 

"चंद्रपूरच्या वरोरा भागातील वायगाव भोयरमधील सोयबीन उत्पादक शेतकरी सुरेश गरमाडे यांनी सोयबीनचे वाण तयार केले आहे. त्यांच्या एसबीजी ९९७ वाणाच्या अजून चाचण्या घेतल्या जातील. याशिवाय दापोली येथील विश्वास फाटक यांच्या श्रेयान नावाच्या अळू वाणाला मान्यता मिळण्यासाठीदेखील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पुणे भागातील एका शेतक-याच्या गुलाबाच्या १७ वाणांना मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

श्री. गरमाडे यांनी तयार केलेले सोयाबीन वाण १०६ दिवसांत तयार होत असून, एकरी १७ क्विंटल उत्पादन देते. यलो मोझॅक रोगाला सहनशील व कीडीला बळी पडण्याची कमी क्षमता असलेल्या या वाणाची उंची ७५ सेंटीमीटर असून, एका झाडाला १४० ते १५० शेंगा येतात. 

प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव म्हणाले, "राज्यातील शेतक-यांनी परंपरेने जतन करून ठेवलेल्या वाणाला या कायद्यामुळे संरक्षण मिळू शकते. त्यामुळे शेतक-यांनी आपल्या शेतात वाढवलेल्या व विकसित केलेल्या वेगळे गुणधर्म असलेल्या वाणाची नोंदणी करून घेण्याची आवश्यकता आहे.

यामुळे १५ वर्षांपर्यंत या वाणावर आपला हक्क अबाधित राहणार आहे." वाण हक्क कायद्यानुसार राज्यातील शेतक-याला कोणतीही माहिती, कागदपत्रे, इतिवृत्ते, शासन निर्णय किंवा नियमांच्या प्रती हव्या असल्यास त्यावर कोणतेही शुल्क आकारता येणार नाही, अशी तरतूद या कायद्यात आहे. 

वाण नोंदणी अर्ज शुल्कदेखील हटविले 
पीक वाण शेतकरी हक्क कायदा २००१ अनुसार वाण नोंदणी करण्याची संधी कृषी विद्यापीठे, खासगी संस्था व बियाणे कंपन्यांनादेखील आहे. त्यासाठी अर्ज शुल्क व नोंदणी शुल्क भरावे लागते. शेतक-यांना मात्र नोंदणीशुल्कातून माफी दिली गेली होती. आता अर्जाचे शुल्कदेखील माफ करण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...