राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा
राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा

पुणे : मॉन्सूनने देश व्यापल्यानंतरही राज्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. कोकण, घाटमाथ्यासह राज्यात काही ठिकाणी दमदार पाऊस पडला, मात्र बहुतांशी ठिकाणी अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मंगळवारपर्यंत (ता.३) कोकणात अनेक ठिकाणी, तर उर्वरीत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) शुक्रवारी संपूर्ण देशभरातील वाटचाल पूर्ण केली. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (माॅन्सून ट्रफ) हिमालयाच्या पायथ्याकडे सरकण्याची शक्यता आहे. शुक्रवार (ता. ६ जुलै) पर्यंत हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडेच राहणार असल्याने या काळात महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. तर गुजरातची उत्तर किनारपट्टी आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती, दक्षिण महाराष्ट्रापासून केरळपर्यंत असलेला किनारी कमी दाबाचा पट्टा यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.   शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणातील संगमेश्‍वर व घाटमाथ्यावरील डुंगरवाडी येथेे उच्चांकी १४० मिलिमीटर पाऊस झाला. तर भिरा, म्हसळा, दोडमार्ग, वाकवली, घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव, दावडी येथे आणि विदर्भातील लाखनी येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.  शुक्रवारी सकाळपर्यंत कोकण, घाटमाथा, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकणातील संगमेश्‍वर व घाटमाथ्यावरील डुंगरवाडी येथेे उच्चांकी १४० मिलिमीटर पाऊस झाला. तर भिरा, म्हसळा, दोडमार्ग, वाकवली, घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव, दावडी येथे आणि विदर्भातील लाखनी येथे १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. राज्याच्या इतरही भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली असल्याचे सांगितले. शुक्रवारी (ता.२९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्त्रोत - हवामान विभाग) : कोकण : संगमेश्‍वर १४०, भिरा, म्हसळा प्रत्येकी १२०, दोडामार्ग, वाकवली प्रत्येकी १००, रोहा, तलासरी प्रत्येकी ९०, भिवंडी, महाड, मंडणगड, माणगाव, पेण, सांगली, सावंतवाडी, उरण प्रत्येकी ७०, कल्याण, कर्जत, कुडाळ, पनवेल प्रत्येकी ६०, माथेरान, मुरूड, पालघर, शहापूर, ठाणे, उल्हासनगर प्रत्येकी ५०, अंबरनाथ, डहाणू, कणकवली, खालापूर प्रत्येकी ४०. अलिबाग, बेलापूर, लांजा, सांताक्रुझ, मुरबाड, पोलादपूर, राजापूर, श्रीवर्धन, सुधागड, वैभववाडी प्रत्येकी ३०. मध्य महाराष्ट्र : शाहूवाडी ६०, राधानगरी ५०, भडगाव, चंदगड, गगनबावडा, महाबळेश्‍वर प्रत्येकी ४०, आजरा, अंमळनेर, धरणगाव, लोणावळा प्रत्येकी ३०, गारगोटी, इगतपुरी, रावेर, वेल्हे प्रत्येकी २०. मराठवाडा : जळकोट, परळी वैजनाथ, फुलांब्री, सोयेगाव, उमरी प्रत्येकी २०. विदर्भ : लाखनी ११०, साकोली ९०, मोहाडी, नागपूर, वर्धा प्रत्येकी ७०, कामठी, सडक अर्जुनी प्रत्येकी ६०, भद्रावती, भंडारा, हिंगणघाट, हिंगणा, मूल, तुमसर प्रत्येकी ५०, कळमेश्‍वर, काटोल, मौदा, नागभिर, सिंदेवाही प्रत्येकी ४०, मोरगाव अर्जुनी, अरमोरी, आष्टी, ब्रह्मपुरी, चिमुर, एटापल्ली, गडचिरोली, खारंघा, कुरखेडा, लाखंदूर, पवनी, पारशिवणी, सालकेसा, समुद्रपूर, सावनेर, वरोरा प्रत्येकी ३०. घाटमाथा : डुंगरवाडी १४०, ताम्हिणी १३०, शिरगाव ११०, दावडी १००, कोयना पोफळी, आंबोणे प्रत्यकी ४०, खोपोली, कोयना नवजा, वळवण, भिवपुरी प्रत्येकी ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com