जाेरदार पावसाअभावी पाणीटंचाईच्या झळा

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे : मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात अद्यापही जाेरदार पावसाने हजेरी लावलेली नसल्याने राज्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. नगर, औरंगाबाद, अमरावती विभागातील अनेक भागांत टंचाईची स्थिती स्थिती गंभीर अाहे, तर पुणे, नागपूर विभागालाही टंचाईचा सामना करावा लागत आहे. साेमवारपर्यंत (ता. २) राज्यातील ८६६ गावे ६०७ वाड्यांना पाणीपुरवठ्यासाठी ८६१ टॅंकर सुरू असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.  गतवर्षीच्या तुलनेत अौरंगाबाद, नाशिक व अमरावती विभागात यंदा खूपच अधिक टंचाई असून, पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा कमी आहेत. नागपूर विभागातही अद्याप टंचाई जाणवत आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या सुरवातीला राज्यातील ५४५ गावे आणि २११७ वाड्यांमध्ये ४९७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गतवर्षी पावसाने आढ दिल्याने पाणीसाठ्याची स्थिती बिकट असलेल्या अमरावती विभागात तुलनेने तिप्पट पाणी टंचाई भासत आहे. टंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.  मराठवाड्यातील सर्वाधिक २५० गावे, ११६ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३१४ टॅंकर सुरू आहेत, तर नाशिक विभागातील २८४ गावे ३७३ वाड्यांना २४० टॅंकर, अमरावती विभागातील २६० गावांना २३८ टॅंकर, पुणे विभागातील ३१ गावे १२० वाड्यांना ३० टॅंकर, तर नागपूर विभागातील ४१ गावांची तहान भागविण्यासाठी ३९ टॅंकर सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  

राज्यात सोमवारी (ता. २) सुरू असलेल्या टॅंकरची जिल्हानिहाय स्थिती
जिल्हा  गावे वाड्या  टॅंकरची संख्या
नाशिक ८८  १८१ ६७
धुळे  १४ ११
जळगाव १२४ १००
नगर ५८ १९२ ६२
पुणे ४  ४४  ७
सातारा  २६ ७३ २१
सांगली 
औरंगाबाद १९६ ७२  २४२
बीड १६ १८
परभणी 
हिंगोली  १५  १८
नांदेड २०  ३५  ३२
लातूर
अमरावती १९ १३
अकोला  ५७ ४२
वाशीम  २३  २१
बुलडाणा  ८८ ९१
यवतमाळ ७३ ७१
नागपूर  ३७ ३८
वर्धा  
एकूण  ८६६  ६०७   ८६१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com