शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार

कर्नाटकच्या नाट्यानंतर राज्यपाल वाजूभाई वाला यांनी राजीनामा द्यावा. येडियुरप्पा यांच्या पराभवापासून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी धडा घ्यावा. मोदी हे देशापेक्षा मोठे नाहीत हे न्यायालयाने दाखवून दिले आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही इतर विरोधकांसोबत जाणार आहोत. - राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार
शक्तिपरीक्षेआधीच येडियुरप्पांची माघार

नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमाताचा आकडा जुळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जनमत चाचणी घेण्याअगोदरच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. ‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगताना येडियुरप्पा भाऊक झाले होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.  कर्नाटकमध्ये भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी मुक्तहस्ताने दिलेली १५ दिवसांची मुदत रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने शनिवारीच चार वाजता विश्‍वासदर्शक ठराव मांडण्यास दिलेल्या आदेशानंतर अखेर मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाता राजीनामा दिला. 

हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार कर्नाटकमध्ये भाजप सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या ''फ्लोअर टेस्ट''साठी हंगामी अध्यक्षपदी राज्यपालांनी भाजपचे आमदार के. जी. बोपय्या यांची नियुक्ती केली होती. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर ‘‘अशा प्रकरणांमध्ये नियुक्ती करण्यासंदर्भात कोणताही कायदा नाही. त्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीची नियुक्ती करण्याचे आदेश राज्यपालांना देऊ शकत नाही’’, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.  कुमारस्वामी होणार मुख्यमंत्री? बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताच विरोधी बाकांवर बसलेले काँग्रेस आणि जेडीएस आमदारांनी आनंद साजरा केला. येडियुरप्पांचे भाषण संपताच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी हस्तांदोलन केले, एकमेकांचे अभिनंदन केले. याधीच कॉंग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाची आॅफर दिली होती. कुमारस्वामी यांनी शनिवारीच राज्यपालांना सत्तास्थापनेबाबतचे पत्र दिले होते. कॉंग्रेस आणि जेडीएस दोन्ही पक्ष मिळून बहुमत होत असल्याने कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार हे आता निश्चित मानले जात आहे. येडियुरप्पा म्हणाले...

  • आम्हाला १०४ जागा देऊन जनमत दिले. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा यांनी मुख्यमंत्रिपदी निवड केली. 
  • बहुमत असते तर राज्य सुजलाम सुफलाम केले असते. 
  • जनमत काँग्रेस, जेडीएससाठी नव्हते. 
  • गेल्या दोन वर्षांपासून मी राज्यभरात दौरे केले. 
  • शेतकऱ्यांच्या वेदना जवळून पाहिल्या आहेत. 
  • शेतकऱ्यांसाठी काम करण्याची माझी इच्छा होती. 
  • प्रतिक्रिया केंद्र सरकारने सरकारी यंत्रणांचा भाजपकडून वापर करण्यात आला. भाजपने आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला. भाजपने आपल्या आमदारांना डांबून ठेवले. पण, आम्ही आमच्या आमदारांना सभागृहात आणले. आता आम्ही सत्ता स्थापनेसाठी जात आहोत. - गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे नेते

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com