agrowon news in marathi,farmers help to dadaji, Maharashtra | Agrowon

दादाजींच्या मदतीला शेतकरीही सरसावले
विनोद इंगोले
गुरुवार, 31 मे 2018

चंद्रपूर ः तब्बल नऊ भात वाणांचे संशोधन करीत भातपट्ट्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उजळवणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या मदतीसाठी शेतकरी धावून आले. अकोला येथील शेतकरी मित्र मंडळाने तब्बल एक लाख रुपयांचा निधी या संशोधकाच्या उपचारासाठी संकलीत केला असून, गुरुवारी (ता.३१) ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हा निधी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविला जाणार आहे. 

चंद्रपूर ः तब्बल नऊ भात वाणांचे संशोधन करीत भातपट्ट्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उजळवणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या मदतीसाठी शेतकरी धावून आले. अकोला येथील शेतकरी मित्र मंडळाने तब्बल एक लाख रुपयांचा निधी या संशोधकाच्या उपचारासाठी संकलीत केला असून, गुरुवारी (ता.३१) ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात हा निधी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविला जाणार आहे. 

नागभीड तालुक्‍यातील दादाजी खोब्रागडे यांना आर्थिक परिस्थितीमुळे शालेय शिक्षणदेखील पूर्ण करता आले नाही. अवघी साडेतीन एकर शेती असलेल्या दादाजींनी याच शेतीला प्रयोगशाळा करीत सुरवातीला एचएमटी हे धानाचे वाण शोधले. पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये हे वाण अत्यंत लोकप्रिय ठरले. एवढ्यावरच न थांबता टप्प्याटप्प्याने त्यांनी थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल नऊ भात वाण संशाेधित केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत माजी राष्ट्रपती (कै.) अब्दुल कलाम यांनी त्यांचा गौरव केला. 

फोर्ब्ज या जगप्रसिद्ध मासिकानेदेखील त्यांच्या कार्याची दखल घेत उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले, परंतु भारतात मात्र त्यांच्या या सेवाकार्याचा अपेक्षित गौरव झाला नाही. याउलट १९९६ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यांचे एचएमटी हे वाण अभ्यासासाठी घेत हेच वाण पीकेव्ही एचएमटी म्हणून आपल्या नावावर खपविले.

सध्या दादाजी अर्धांगवायू व आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना उपचाराकरिता आर्थिक मदत व्हावी याकरीरिता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्र देण्यात आले, परंतु त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर मात्र वाढत्या जनरेट्यामुळे झुकत शासनाकडून दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. 

शेतकरी मित्र मंडळाने जपली सहृदयता ॲग्रोवनमध्ये १४ मे रोजी दादाजी खोब्रागडे यांच्या संदर्भाने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. आजारपणात भात संशोधकाला शासनाने वाऱ्यावर सोडल्याचे यात म्हटले होते. या वृत्तामुळे व्यथित झालेल्या अकोल्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या गटाने दादाजींना मदत करण्याचा निर्णय घेतला. शेतकरी मित्र मंडळ म्हणून हा ११२ सदस्यांचा गट आहे. विनोद साखरकर, शाम आपोतीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि अल्पावधीतच १ लाख रुपयांपेक्षा अधिकचा निधी गोळा झाला. 

कृषी व्यावसायिकांची माणुसकी
अकोला येथे जय गजानन मित्र मंडळ नावाने कृषी व्यावसायिक, कृषी कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असलेला समूह आहे. जयेश सदावर्ते यांच्या पुढाकारात या समूहाने २१ हजार रुपयांचा निधी गोळा केला. गुरुवारी (ता.३१) तो देखील खोब्रागडे कुटुंबाकडे सुपूर्त केला जाणार आहे. संवेदना गृप, एमकेपी, जय गजानन मित्र मंडळ, काळूराम रुहाटीया ट्रस्ट यांनीदेखील आर्थिक योगदान दिले आहे. वाशीम येथील रवी मारशेटवा,र तसेच दत्ता वाळके यांनी थेट खात्यात रक्‍कम जमा केली.

इतर अॅग्रो विशेष
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
जमीन सुपीकता जपत दर्जेदार संत्रा...दर्जेदार संत्रा फळांच्या उत्पादनात सातत्य राखत...
केळीत दोन हंगामात कारले पिकाचा प्रयोगजळगाव जिल्ह्यातील करंज येथील रामदास परभत पाटील...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
लावलेली वनवृक्षे जगवावी लागतीलनिसर्गाचा समतोल सातत्याने ढासळत असून, जगभरातच...
खजुराची शेती खुणावतेय विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या फारशा सोयी...
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...