agrowon news in marathi,FRP increased by 200 rupees, Maharashtra | Agrowon

ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढ

वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘एफआरपी’त प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१८) घेतला. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०१८-१९ च्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना आता प्रतिटन २७५० रुपये एफआरपी मिळणार आहे. 

नवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘एफआरपी’त प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (ता.१८) घेतला. आॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या २०१८-१९ च्या गाळप हंगामासाठी शेतकऱ्यांना आता प्रतिटन २७५० रुपये एफआरपी मिळणार आहे. 

ऊस उत्पादकांना साखर कारखान्यांनी द्यावयाच्या किमान दरात, एफआरपीत वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट कमिटी आॅन इकॉनॉक अफेअरने (सीसीइए) बुधवारी घेतला. अलीकडेच केंद्राने खरिपातील १४ पिकांच्या हमीभावात मोठी वाढ केली आहे. त्या वेळी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने उसाच्या एफआरपीत २०० रुपये वाढ करून प्रतिक्विंटल २७५० रुपये दर देण्याची शिफारस केंद्राकडे केली होती. २०१७-१८ च्या हंगामात केंद्राने उसासाठी २५५० रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर केली होती. सध्या १० टक्के उताऱ्याशी एफआरपी संलग्न करण्यात आली आहे. यापेक्षा जास्त उतारा आल्यास ०.१ टक्के वाढीमागे प्रतिक्विंटल २.६८ रुपये वाढ देण्यात येणार आहे. 

एफआरपीत वाढ केल्याचा अधीक फायदा जे राज्य केंद्राच्या दरापेक्षा जास्त राज्य निर्धारित मूल्य (एसएपी) देतात अशा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. देशातील महत्त्वाचे ऊस उत्पादक उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाना त्यांचे राज्य निर्धारित मूल्य जाहीर करतात. त्यांचे राज्यनिर्धारित मूल्य साधारणतः एफआरपीपेक्षा जास्त असते

जगात ब्राझीलनंतर साखर उत्पादनात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. २०१७-१८ च्या विपणन वर्षात देशात ३२.२५ दशलक्ष टन साखर उत्पादन झाले होते. ‘इस्मा’ने अलीकडेच देशातील चांगल्या पावसामुळे ऊस उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे २०१८-१९ च्या गाळप हंगामात साखर उत्पादनात १० टक्क्यांनी वाढून विक्रमी ३५.५ दशलक्ष टन उत्पादन होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. 

 


इतर अॅग्रो विशेष
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...