साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल

AISTA च्या पीक समितीच्या मते, यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर मात केली आहे. यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादन ११.५ दशलक्ष टनांवर जाईल, असा AISTA चा अंदाज आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात १०.६ दशलक्ष टन साखर उत्पादित झाली होती.
sugarcane-maharashtra
sugarcane-maharashtra

ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक समितीने या गाळप हंगामात (ऑक्टोबर २०२१- सप्टेंबर २०२२) ३१.९ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे. गेल्या हंगामातील साखर उत्पादनाचे प्रमाण ३१ दशलक्ष टन एवढे होते. समितीने यंदा ६ दशलक्ष टन साखर निर्यात केली जाईल,असा अंदाज समितीने व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात ७.९ दशलक्ष टन साखर निर्यात करण्यात आली होती.      

AISTA च्या पीक समितीच्या मते, यंदाच्या हंगामात साखर उत्पादनात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर मात केली आहे. यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादन ११.५ दशलक्ष टनांवर जाईल, असा AISTA चा अंदाज आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात १०.६ दशलक्ष टन साखर उत्पादित झाली होती. 

साखर उत्पादनात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात यंदा १०.५ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. गेल्या हंगामात हे प्रमाण ११. १ दशलक्ष टन होते. साखर उत्पादनात तिसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकात यंदा ४.८ दशलक्ष टन साखर उत्पादित केली जाईल, असा अंदाज आहे. गेल्या हंगामात कर्नाटकाने ४.७ दशलक्ष टन साखर उत्पादित केली होती.   

व्हिडीओ पहा 

समितीच्यामते २०२१-२०२२ मधील साखरेची मागणी २ टक्क्याने वाढली आहे. यंदा साखरेची मागणी २७ दशलक्ष  टनांवर गेली होती. गेल्यावेळी ही मागणी २६.५ दशलक्ष टन होती. 

ऊस उत्पादनातील वाढ, रिकव्हरी रेट, हेव्ही मोलॅसिसपासूनच्या इथेनॉलनिर्मितीचे प्रमाण लक्षात घेऊन समितीने यंदा साखर उत्पादनाच्या वाढीचा अंदाज वर्तवला असल्याचे AISTA च्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

देशातील साखर उत्पादनाबद्दलचा AISTA चा हा पहिलाच अंदाज आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचा दुसरा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. साखरेच्या देशांतर्गत किमती कशा राहतील, यावर साखर निर्यात अवलंबून असल्याचेही AISTA चे अध्यक्ष प्रफुल्ल विठ्ठ्लानी यांनी नमूद केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com