Team Agrowon
राजस्थानमध्ये गेल्यापासून काही दिवसांपासून उंटांचे जत्थेच्या जत्थे दाखल झाले होते.
जिल्हा प्रशासनाने १५४ उंटांना ताब्यात घेऊन राजस्थानला रवाना करण्याचा निर्णय घेतला
या उंटांपैकी पांजरापोळमध्ये १०९ उंट तसेच मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत.
आश्रयासाठी असलेल्या उंटांपैकी बुधवारी एकाच दिवशी तीन उंटांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी तीन उंटांच्या मृत्यूनंतर उंटांच्या मृत्यूची संख्या १२ वर पोहोचली आहे.
पोट खपाटीला गेलेले, थकलेले, त्राण गळालेले, पायांवर जखमा असलेल्या अवस्थेतील हे उंट आढळून आले आहे.
उंटांचे मृत्यू वाढू लागल्याने त्यांना राजस्थानला पायी न पाठविता त्यांच्यासाठी गाड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
उंटांना घेऊन जाणारे ‘रायका’ नाशिकमध्ये दाखल झाली असून लवकरच त्यांची लवकरच रवानगी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.