Belgaum Issue : सीमा प्रश्नावर झाली बैठक

Team Agrowon

बेळगाव सह सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हा लढा पुढे नेण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

EKnath shinde | CMO FB Page

बेळगावसहित सीमावर्ती भागातील नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसहित सर्वच प्रमुख योजनांचा लाभ देण्याचा आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

EKnath shinde | CMO FB Page

तसेच सीमावर्ती भागाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या लढ्याला बळकटी मिळावी यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली.

EKnath shinde | CMO FB Page

या विषयावर वेळोवेळी होणाऱ्या सुनावणीबाबत समन्वय साधण्यासाठी मंत्रिमंडळातील सहयोगी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

EKnath shinde | CMO FB Page

सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना देखील स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

EKnath shinde | CMO FB Page

सीमावर्ती भागातील नागरिकांवर होणारे अन्याय दूर व्हावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदीआणि गृहमंत्री अमित शहा जी यांची भेट घेणार आहोत.

EKnath shinde | CMO FB Page

त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून सीमावर्ती भागातील प्रत्येक बांधवाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिली.

EKnath shinde | CMO FB Page
cta image | Agrowon