मनोज कापडे
भटकंतीत सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात रानफुल प्रसन्नपणे डुलत होते.
काहीवेळेत मग न्याहारीसाठी तेथे एक मधमाशी आली आणि फुलावर अलगद बसली. फुल मग आनंदाने मधमाशीला मकरंद भरवू लागले..!
मी डोंगर उतरून त्यांच्या घरासमोर जाईपर्यंत त्या दरवाजात थंडगार पाण्याचा तांब्या घेऊन उभ्या होत्या. नंतर चहा पाजला. विचारपूस केली आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
असा तळपतो भास्कर, या राजगडावर
असा उजळतो आत्मविश्वास, या गिरीदुर्गावर
आमच्या भगिनी उर्फ संजीवनी माची..!
आज धुंद चंद्र प्रकाशात माझ्या प्रिय राजगडाकडे निघालो आहे. छायाचित्रात खाली उजव्या बाजूला तीन दिवे दिसत आहेत. तो पवित्र तोरणा गडाचा पायथा. त्याच्या वरच्या बाजूला धूसर पर्वतरांग तोरणाची आहे..!