Team Agrowon
कृषि प्रदर्शनात राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि खासगी कंपन्या यांच्या कृषि तंत्रज्ञान आधारीत ५०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांनी कृषी प्रदर्शनातील प्रत्येक दालनास भेट देऊन विद्यापीठ विकसित विविध कृषि तंत्रज्ञानाची माहिती घेतली.
मुख्यमंत्र्यांनी कृषी विद्यापीठ विकसित संशोधन जास्तीत जास्त शेतकरी बांधवा पर्यंत पोहचविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
नांदेड येथील कापुस संशोधन केंद्राच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नैसर्गिक रंगीत कापसापासुन बनवलेले विषेश जॉकेट भेट देण्यात आले.
हे विशेष जॅकेट मुख्यमंत्र्यांनी परिधान करून यासारख्या शेतमाल मुल्यवर्धन तंत्रज्ञानाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कृषि प्रदर्शनात विद्यापीठाचे विविध तंत्रज्ञानावर आधारीत एकुण सत्तावीस दालनाचा समावेश असुन राज्यातील शेतकरी बांधव व कृषिचे विद्यार्थी, कृषि विस्तारक मोठया प्रमाणात भेट देत आहेत.