Animal Care : पाच मांजरांची एक गोष्ट

महारुद्र मंगनाळे

एक मांजरी आणि तिची इवलीशी पाच पिलं.महिन्यापेक्षा अधिक काळ हे एका खोलीत होते.मांजरीला नियमितपणे दूध देत असल्याने,ती सकाळपासून सायंकाळपर्यंत हट परिसरातच राहायची.दिवसभरात पिलांना पाजण्यासाठी एक-दोन वेळा जात असावी.

महारुद्र मंगनाळे

रात्री मात्र ती पिलांसोबतच असायची.दोन आठवड्यापूर्वी दिड दिवस ती आम्हाला दिसली नाही तेव्हा आम्ही चिंतीत झालो होतो...पण ती आली.या पिलांना रूमबाहेर काढून रुद्रा हटवर कधी आणते,याची आम्हाला उत्सुकता होती

महारुद्र मंगनाळे

.काल दुपारी लातूरहून मी हटवर पोचलो तेव्हा माझ्यासमोरचं या सगळ्यांचं आगमन झालं. मी लगेच सविताला ही आनंदाची बातमी सांगीतली.हटच्या तिसऱ्या नंबरच्या शेडवर पत्रे होते.बाकी चारही बाजुंनी ते मोकळंच होतं.भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ लागला म्हणून,महिनाभरापूर्वीच सविताने लोखंडी जाळ्या लावून ते बंद केलं.

महारुद्र मंगनाळे

दरवाजाही बसवला.आता ही भली मोठी रूम मांजरी आणि पिलांना मिळालीय.दरवाजा बंद केला की,कुत्राही आत येऊ शकत नाही.ते इथं पूर्णपणे सुरक्षित आहेत.आजपर्यंत कुत्र्याला बघून पळणारी मांजरी,पिलं सोबत असताना, आक्रमकपणे पाय रोवून उभी राहातेय.

महारुद्र मंगनाळे

तिनं बगिराला नखांचा प्रसाद दिलाय की,भीती घातलीय,ते माहित नाही.पण बगिरा हटकडं फारसा फिरकत नाही.मी बघतोय.मांजरी पिलांना प्रशिक्षण देतेय.

महारुद्र मंगनाळे

सकाळी जाळीवर चढत एक पिलू उंचावर गेलं...आणि घाबरलं.ते कितीतरी वेळ जोरजोरात ओरडत होतं.पण मांजरीने त्याच्याकडे साफ दूर्लक्ष केलं.अर्ध्या तासाने पिलू खाली आलं. सवितानं मांजरीला दूध टाकलं की,ती थोडसं पिल्यासारखं करून बाजुला होते.मग पिल्लं ते पितात.

महारुद्र मंगनाळे

सकाळी खारूताईचं शेपूट तिथं पडलं होतं.मांजरीनंच शिकार केली असावी. आणखी काही दिवस पिल्लं कुठही शी-शू करतील.पण लवकरच मांजरी पिलांना ते ही शिकवेल.

महारुद्र मंगनाळे
cta image | Agrowon