Summer Season: एक झाड वठलंय, एकाला फांद्या फुटल्यात आणि एकाला पालवी!

Team Agrowon

दिस सरलं. वर्ष सरली. कॅलेंडर बदलली. पंचांग बदललं. पैसं साचलं. संधी आली. भावकीतली जमीन इकाया निघाली. बोलणी झाली. व्यवहार ठरला. आणि गावगुंडी आड आली. व्यवहार मोडला. भावकीत हसं झालं. गडी इरंला पेटला.

Summer | A B Mane

पेटत राहीला. धगधगत राहीला. संधी पुन्हा कचाट्यात सापडली. बुडीताची जमीन. म्हतारीला भावकीनं अडवलेली. पिचवलेली. आली.

Summer | A B Mane

म्हणे तू घेतली तर चार पैकं कमी. ठरलं. जवळचं सगळं पैसं, त्यात किडूक मिडूक इकलं, कमी पडलं तं सोसायटी काढली. भावकीच्या नाकावर टिच्चून जमिन घेतली. दोनाची चार झाली. पण...

Summer | A B Mane

कर्ज वाढलं. व्याज फिटंना. मॉक्कार माल केलं. तरी पैसा व्हयना. हाडाची काडं आन् जिवाचं तुणतुणं झालं. घोर लागला. कसदार गडी खंगाया लागला. पोरगं 12 वी ला. पहिल्या नंबरातला गडी. बापाचं हाल देखवना. साळत यायचं आन् रडत बसायचं. बापाला म्हनलं...

Summer | A B Mane

मला साळा जमना आता, मी थांबतो घरी. पोराचा ढोर झाला. खेळतं पाय राबतं झालं. पाच धा वर्ष जिवाचं रान केलं. कर्ज फे़डलं. बापाची पाठ, भावकीत थाट, शर्टाची कॉलर ताठ झाली. पोरगा मुरलाय आता ढेकळात. राबतोच आहे चार एकरात.

Summer | A B Mane

त्याला आता नवं टारगेट खुणवतंय. चाराची आठ एकर करायची. स्वतः करपला पण आता भाऊ बहरावा म्हणून जिव काढतोय.

एक झाड वठलंय, एकाला फांद्या फुटल्यात आणि एकाला पालवी !

Summer | A B Mane
Onion Rate | Agrowon