Team Agrowon
माळेगाव, जि. पुणे : शारदानगर येथे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी विज्ञान केंद्र, अटल इनक्युबेशन सेंटर आयोजित १७० एकर वरील ‘कृषिक-२०२३’ कृषी प्रदर्शनास गुरुवार (ता. १९)पासून उत्साहात प्रारंभ झाला.
या प्रसंगी कृषिमंत्री अब्दूल सत्तार, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), राजेंद्र पवार (Rajendra Pawar), सुनंदा पवार उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये १७० एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे प्रयोगशील शेती प्लॉट, निर्यातक्षम पालेभाज्या व फळबागा, मशागतीची अवजारे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केल्या.
मशनरींपासून ते मिनी रोबो ट्रॅक्टरपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पाहावयास मिळत आहे.
या प्रसंगी बोलताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले, ‘‘शेतीमध्ये आगामी काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढणार आहे.
ड्रोन तंत्रज्ञान, मिनी रोबो ट्रॅक्टर ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न आहे.’’