वासराची शिंगनळी जाळावी का?

Roshani Gole

डीसबडिंग म्हणजे वासरे लहान असतानाच त्यांची शिंगनळी जाळली जाते. यामध्ये शिंगाना वाढीच्या अवस्थेतच अटकाव घातला जातो

Agrowon

शिंगनळी जाळताना वासरू लहान म्हणजे एका आठवडे वयाच्या आतच शिंगाची वाढ करणाऱ्या पेशी नष्ट केल्या जातात. असे केल्याने शिंगाचे मूळ कपालयुक्त कवटीपासून मुक्त होऊन, ते सहजपणे काढले जाते.

Agrowon

शिंगनळी जास्त कीटक असणाऱ्या हंगामात काढल्यास, जखमेवर फ्लाय रीपेलन्ट लावावे.

Agrowon

शिंगनळी जाळून टाकण्यासाठी लाल तापलेल्या लोखंडाचा वापर करून, शिंगे काढल्यास, त्यावर अँटिसेप्टिक क्रीम लावावी.

Agrowon

शिंगे नसलेल्या जनावरांना कमी जागेची आवश्यकता असते.शिंगे काढल्याने जनावरांना शिंगाचा कर्करोग होत नाही.

Agrowon

जनावरांचे वय ओळखण्याच्या पद्धतीमध्ये शिंगाची वलये मोजून अंदाजे वय काढले जात असल्याने, या प्रकारात अडथळा येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon