Team Agrowon
मत्स्य व्यवसायाच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र सरकारने नील क्रांती धोरण निश्चित केले आहे.
नील क्रांती ही योजना मत्स उत्पादनाशी संबंधीत केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे.
शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्त्रोत म्हणून मत्सशेती व्यवसायाकडे पाहिले जाते. त्यामुळे केंद्र सरकारकडून मत्सपालन व्यवसायाला विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.
केरळ राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मत्स उत्पादन केले जाते. आता केरळच्या धरतीवर झारखंडमध्येही नील क्रांतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
झारखंडचे कृषीमंत्री बादल पत्रलेख यांनी नुकताच केरळचा दौरा केला. यावेळी त्यांनी केरळमधील मत्स उत्पादनासंबंधी माहिती जाणून घेतली.
केरळप्रमाणे झारखंडमध्येही मत्स उत्पादनाचे तंत्रज्ञान स्विकारण्यात येणार असल्याचे पत्रलेख यांनी म्हटले आहे.
त्यामुळे आता झारखंड सरकारही मत्स उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.