Agro tourism : कृषी पर्यटनातून मिळू शकतात रोजगाराच्या अनेक संधी

Team Agrowon

कृषी पर्यटन व्यवसायाची नोंदणी करणे आवश्यक नाही.

Agro tourism | Agrowon

कृषी पर्यटन विकास महामंडळ किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत नोंदणीकृत पर्यटन केंद्रांना ३० टक्के सरकारी अनुदान व सहकारी बँका आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून १० टक्के व्याजदराने ५० लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

Agro tourism | Agrowon

एक एकर जमिनीवर रस्ता, पाणी, लाइट या प्राथमिक सुविधा उपलब्ध असतील तर १५ लाख रुपये किमान भांडवलामध्ये कृषी पर्यटन व्यवसाय सुरू करता येतो.

Agro tourism | Agrowon

हा व्यवसाय करताना तुमचे कृषी पर्यटन केंद्र असेच असावे असा काही नियम नाही. पर्यटन केंद्राचे यश हे पर्यटकांच्या समाधानावर अवलंबून असते आणि पर्यटकांचे समाधान त्यांना मिळणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.

Agro tourism | Agrowon

तुम्ही राहत असलेल्या भागातील वातावरण, तिथली पिके, संस्कृती, येणारा पर्यटक वर्ग यांचा विचार करून तुमच्या सर्जनशीलतेनुसार विशिष्ट थीम निवडून तुम्हाला हवे तसे तुम्ही तुमचे कृषी पर्यटन केंद्र बनवू शकता.

Agro tourism | Agrowon

येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळा, नवीन व आनंददायी अनुभव देता येईल, यासाठी आकर्षक फुले, वेली, कीटक, फुलपाखरे, मातीचे प्रकार पाहता येतील, हे कृषी पर्यटनात पाहावे.

Agro tourism | Agrowon
Jowar Harvesting | Agrowon