Agrowon Diwali Ank: सह्याद्रीच्या शिखरावर झळकला अॅग्रोवनचा दिवाळी अंक

मनोज कापडे

सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर कळसुबाई (kalsubai Mountain) सर करीत अॅग्रोवनचा दिवाळी अंक (Agrowon Diwali Ank) झळकवण्याचा संकल्प अहमदनगर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी काशिनाथ चेंडू खोले यांनी केला. मोहिमेला जाण्यासाठी मध्यरात्री तीन वाजेपासून तयारी सुरू झाली. कडाक्याच्या थंडीत अंघोळीची तयारी.

न्याहारीआधी जनावरांना वैरणपाणी आणि पुजन केले.

पेंडशेत गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेत मोहिमेला सुरुवात.

पहाटे पाच वाजता बारी गावाच्या पायथ्याकडून चढाईला सुरुवात.

गच्च अंधारात ओढा पार करीत शिखराकडे कुच.

दगडधोंड्यांची तमा न बाळगता अंधारात एकट्याचा प्रवास.

चढाई चालू असतानाच अॅग्रोवनच्या दिवाळी अंकासह सर्योदयाचे दर्शन.

जुन्या अवघड वाटेने शिखरावर चढाई केली.

सह्याद्रीतील कळसुबाई शिखरावर प्रयोगशील शेतकरी काशिनाथ खोले यांनी अॅग्रोवनचा दिवाळी अंक झळकवला. डावीकडून शेतकरी नामदेव किसन खाडे, रामदास किसन खाडे, ऋषिकेश बाळकृष्ण खाडे व बाळू नाना खाडे.

cta image