Village Life : एका डोंगर माळरानाची सोबत

Team Agrowon

माझ्या प्रिय मित्र माळरान किती तरी दिवस विचार करत होते तूझ्यावरती काहीतरी लिहिलं आज लिहुनच टाकते.एका वर्षांपूर्वी मी गावाकडे आले तेव्हा ईकडे कोणी माझे मित्र-मैत्रिणी नव्हते किंवा कोणाशी फार जवळीकही नव्हती. तेव्हा विरंगुळा म्हणून मी कधीमधी तुझ्या कडे भटंकयला यायचे ते भटकणं नंतर वाढतच गेलं आणि आता ते रोजच झालं आहे.

संचित सूर्यवंशी

आधी तु मला बिलकुल आवडायचं नाही मला वाटायचं काय ठेवलंय त्या भकास माळरानावर नुसती कुसाळ पण नंतर तु जसं जसं समजत गेला तुझ्या असण्यातुन तेव्हा मजा येईल लागली मला तुझ्या सोबत.

संचित सूर्यवंशी

तुझासोबत मी असंख्य सुंदर सकाळ आणि संध्याकाळ पाहिल्या.सांध्यकाळचे सुर्यकिरण तर माझे आवडते पडुन राहयचं निवांत एकदम.

संचित सूर्यवंशी

तुझाजवळ आल्यानंतर मला माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली जी किती दिवस झाले सुटतच नव्हती.

संचित सूर्यवंशी

माझ्या आवडत्या खडकावर बसून डोळे शांत मिटून आपली भीती अनुभवत उन्हाचे सूर्यकिरण अंगावर घेत खडक न डोळे उघडून आकाशात उडणारे पक्षी बघितलं की माझी भीती कुठल्या कुठे गायब होते ही तू मला दिलेली सर्वोत्तम भेट वस्तू.

संचित सूर्यवंशी

असं बरंच काही तु मला दिला आहे आणि देत राहशील माझ्या प्रिय मित्रा तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.

संचित सूर्यवंशी
cta image | Agrowon